गेल्या २७ वर्षे वाचनसेवा अविरत देणाऱ्या स्त्री शक्तीचा गौरव


कल्याण : कल्याण मधील नामवंत अशा याज्ञवल्क्य संस्थेतर्फे  आपल्या उज्ज्वल कार्यपद्धतीने कार्य करणाऱ्या सार्वजनिक वाचनालय कल्याणच्या ग्रंथपाल गौरी देवळे यांचा सन्मान सोहळा सुप्रसिद्ध लेखिका माधवी घारपुरे यांच्या हस्ते नुकताच पार पडला. गेल्या २७ वर्षांपासून गौरी देवळे या वाचन संस्कृतीचा वारसा जपण्याचे मौलिक कार्य अखंडित करीत आहेत.


गौरी देवळे या वाचकांची आवड ओळखून त्यांना आवश्यक असलेले पुस्तक उपलब्ध करून त्यांची वाचनाची भूक भागवून वाचन सेवा पुरवित आहेत. म्हणूनच वाचक व लेखक यांमधील त्या दुवा आहेत.गेली अनेक वर्षे त्यांनी वाचन सेवेत स्वतःला झोकून दिले आहे. वाचनालयातील प्रत्येक पुस्तकाला त्यांच्या स्पर्शाची ओळख आहे.


 दुर्मिळ पुस्तकांशीही त्यांची घनिष्ट मैत्री आहे म्हणूनच अविरत अखंडित वाचनसेवा देणाऱ्या त्या सन्मान रणरागिणी ठरल्या आहेत. तसेच ठाणे जिल्हा ग्रंथालय कार्यकारिणी पदावरही त्या कार्यरत आहेत. त्यांच्या या विधायक कार्यामुळे सर्व स्तरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.


Post a Comment

0 Comments