फटका गँगच्या गुन्हेगाराचा फिल्मी स्टाईलने पाठलाग करत रेल्वे पोलसांनी केले जेरबंद


कल्याण  : लोकल, मेल, एक्सप्रेस ट्रेन मधुन प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या  हातावर फटका मारुन मोबाईल, पर्स , बॅग पळविणाऱ्या फटका गँगच्या सराईत गुन्हेगाराला कल्याण लोहमार्ग पोलिसांनी फिल्मी स्टाईलने पाठलाग करत मोबाईलसह पकडून जेरबंद केले आहे.  अजय अर्जुन कांबळे, (वय २४, रा. होमबाबा टेकडी, पत्रीपुल, कल्याण) असे जेरबंद केलेल्या फटका गँगच्या गुन्हेगारच नाव आहे. 


          मध्य रेल्वेच्या मार्गावर धावणाऱ्या  लोकल, मेल ट्रेनमधून दरवाजात उभे राहून  प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे हातावर फटका मारुन मोबाईल व इतर वस्तू पळविणाऱ्या विरोधात कारवाईची मोहीम १६ मार्च पासून राबविण्यात येत आहे. यासाठी विविध फटका गँगच्या पाईंटवर  कल्याण रेल्वे पोलीस ठाण्याचे  वरिष्ठ पोलीस निरीक्षक,   वाल्मीक शार्दुल यांनी  गुन्हे तपास पथकाची नेमणूक केली. या पथकात पोलीस उपनिरक्षक   पवार, पोहवा, कुटे, पोना जगताप, विशे, चव्हाण, शेळके,  केदार व  व्हरकट यांना सुचना व मार्गदर्शन करुन पथक तयार करुन या पोलीस  पथकांना फटका गँग पॉईटंच्या ठिकाणी सापळा लावण्याचे  आदेश दिले. 


        त्याअनुषगाने २१ मार्च रोजी सायंकाळच्या सुमारास  डाऊन बदलापुर लोकलच्या मोटरमन बाजुकडील प्रथम वर्गाच्या महिलांच्या डब्यात डाव्या बाजुच्या दरवाज्यात उभे राहुन एक महिला प्रवास करीत होती. त्यावेळी लोकल  कल्याण ते विठ्ठलवाडी रेल्वे स्टेशन दरम्यान स्लो धावत असतांना पोल नं.५३/२०२० वर फटका गँगचा आरोपी  अजय चडून  पुर्व तयारी करुन बसला होता. 


         लोकल त्या रेल्वे पोल जळून जात असतानाच त्याने महिलेच्या हातावर जोरदार फटका मारून महागडा मोबाईल खाली पाडून तो मोबाईल घेऊन  पळुन जात असतांना गस्तीवरील   पोलीस शिफाई केदार यांनी त्याचा फिल्मी स्टाईलने पाठलाग करून त्याला पकडण्याचा प्रयत्न केला असता आरोपीने पोलीस शिफाई केदार  यांच्या  हाताला जोरदार  चावा घेवुन  दुखापत केली. मात्र तरीही पोलीस पथकाने त्याचा पाठलाग करून  मोबाईलसह  रंगेहाथ पकडले. 


         या आरोपी विरोधात  भादंवि.  कलम ३९२,३८२,३३२ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. तर आज (बुधवारी ) कल्याण रेल्वे न्यायालयात हजर केले असता २४ मार्च  पर्यंत पोलीस कोठडी सुनावली असल्याची माहिती कल्याण लोहमार्ग पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वाल्मीक शार्दुल यांनी दिली.

Post a Comment

0 Comments