यपटीव्हीला मिळाले टाटा आयपीएल २०२२ चे प्रसारण अधिकार


■सलग ५व्या वर्षी मिळाले हक्क; ९९ देशांमध्ये करणार प्रसारण ~


मुंबई, २९ मार्च २०२२ : बहुप्रतिक्षित टाटा आयपीएलला सुरुवात झाली आहे. दरम्यान ९९ देशांमध्ये या स्पर्धेच्या प्रसारणासाठी यपटीव्हीने स्ट्रिमिंग अधिकार मिळवले आहेत. २९ मे २०२२ पर्यंत प्रसारणासह यपटीव्हीचे ग्राहक सामने पाहण्याचा आनंद घेऊ शकतात आणि त्यांच्या घरांमधूनच आरामात व सुरक्षितपणे त्यांचे आवडते संघ व खेळाडूंना उत्साहित करू शकतात.


या सामन्यांचे प्रसारण ऑस्ट्रेलिया, कॉन्टिनण्टल युरोप, आग्नेय आशिया (सिंगापूर वगळून), मलेशिया, मध्य व दक्षिण अमेरिका, मध्य आशिया, श्रीलंका, पाकिस्तान, जपान, नेपाळ, भूतान, मालदिव आदी देशांमध्ये यपटीव्हीवर करण्यात येईल.


यपटीव्हीचे संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी उदय रेड्डी म्‍हणाले, "क्रिकेट पाहण्यासाठी नेहमीच प्रेक्षकांची मोठी गर्दी होत असते आणि आयपीएलने त्याच्याशी संबंधित फॉर्मेट व उत्साहामध्ये नवीन बदल केले आहेत. प्रेक्षकांना क्रिकेटचा आनंद देण्याच्या उद्देशाशी संलग्न राहत आम्हाला जगभरातील ९९ देशांपर्यंत या स्पर्धेचे प्रसारण विस्तारित करण्यामध्ये पसंतीचे स्ट्रिमिंग व्यासपीठ असण्याचा आनंद होत आहे. आम्ही खात्री घेत आहोत की, आमचे प्रबळ बॅकएण्ड तंत्रज्ञान भारताला आंतरराष्ट्रीय लीग्जच्या संदर्भात जगभरात सर्वोच्च स्थान मिळवून देणा-या खेळाची विनाव्यत्यय, रिअल-टाइम स्ट्रिमिंग सेवा देईल."


डिस्नी स्टारच्या अॅक्विझिशन अॅण्ड सिन्डिकेशन - स्पोर्टसचे प्रमुख हॅरी ग्रिफिथ म्हणाले "आम्हाला यपटीव्ही सोबतचा दीर्घकालीन सहयेाग सुरू ठेवण्याचा आनंद होत आहे, जे जगभरातील भारतीय समूहांना जागतिक दर्जाच्या कन्टेन्टचे मनोरंजन देते. टाटा आयपीएल २०२२ सुरू झाल्यापासून सर्वात मोठे व सर्वात उत्साहवर्धक पर्व असण्याची खात्री देते."

Post a Comment

0 Comments