केडीएमसीने परवानगी दिलेल्या सार्वजनिक प्रसाधनगृह केडीएमसीचा हाथोडा केडीएमसीने अजब कारभार


कल्याण : कल्याण पश्चिमेतील सहाय्यक पोलिस आयुक्तांच्या कार्यालया समोर आणि कल्याण जिल्हा सत्र न्यायालयाच्या संरक्षक भिंतीस लागून असलेल्या फूटपाथवर केडिएमसीने सार्वजनिक  प्रसाधनगृह उभारण्यास परवानगी दिलेल्या  बांधकामावर केडीमसीने धडक कारवाई करीत  जेसीबीने हे बांधकाम जमीनदोस्त केले आहे. या सार्वजनिक प्रसाधनगृहाच्या बांधकामावर पोलिस आणि न्यायालयाने हरकत घेतल्याने हे काम पाडण्यात आले आहे. मात्र आधी परवानगी देऊन नंतर काम पाडणे कितपत योग्य आहे असा सवाल शांती सेवा संस्थाने उपस्थित केला आहे.


      कल्याण पश्चिमेतील सहाय्यक पोलिस आयुक्तांच्या कार्यालया समोर आणि कल्याण जिल्हा सत्र न्यायालयाच्या संरक्षक भिंतीस लागून असलेल्या फूटपाथवर याआधी एक मुतारी होती. मात्र २०१५ साली तत्कालीन आयुक्त ई. रविंद्रन यांनी शिवाजी महाराज चौक ते महात्मा फुले चौकार्पयत रस्ता रुंदीकरण केले. त्यावेळी रस्त्यालगत असलेल्या मुतारीला पाडून टाकण्यात आले. आत्ता या परिसरातील व्यापारी वर्गास विशेषत: बाजारात येणा:या महिलांना राईट टू पी नुसार मुतारीची सोय नाही.


       त्यामुळे त्यांची कुंचबणा होत होती. व्यापारी वर्गाची मागणी पाहता महापालिकेने शांती सेवा संस्थेला त्याठिकाणी प्रसाधनगृह उभारण्यास परवानगी दिली. बांधकाम सुरु करण्याचा दाखला दिला. हे काम सुरु असताना त्याला सहाय्यक पोलिस आयुक्त कार्यालयाने हरकत घेतली. त्याच बरोबर न्यायालयाच्या संरक्षक भिंतीला लागून हे प्रसाधनगृह नको असे सांगण्यात आले. त्यामुळे जलमलनिस्सारण विभागाने हे काम पाडण्याचेआदेश काढले.


महापालिकेने आत्ता काम पूर्णत्वास आले असताना हे काम जेसीबीने जमीनदोस्त केले आहे. या पाडकामाचा खर्चही शांती सेवा संस्थेकडून वसूल केला जाईल असे म्हटले आहे. शांती सेवा संस्थेच्या भाविका सोलंकी यांनी सांगितले कीआमची संस्था ही विधवा महिलांची आहे. आधी महापालिकेने परवानगी दिली. त्यानंतर कारवाई केली. त्यामुळे संस्थेचा प्रसाधन बांधकामावर झालेला १२ लाखाचा खर्च वाया गेला आहे. महापालिकेने हा खर्च भरुन द्यावा. पोलिस आणि न्यायालयाची हरकत होती. तर परवानगीच द्यायची नव्हती. आत्ता पर्यायी जागा द्यावी अशी संस्थेने मागणी केली आहे.


       कल्याण डोंबिवली महापालिकेने सार्वजनिक मुतारी व शौचालय तोडून एका प्रकारे कल्याणच्या सामान्य जनतेवर अन्याय केला आहे. मुळात पुर्वी मुतारी असलेल्या ठिकाणीच हे शौचालय बांधण्यात आले होते. मग नागरिकांचे हित न बघता कोणाच्या स्वार्थासाठी हे शौचालय तोडण्यात आले. येणाऱ्या कल्याण महापालिका निवडणुकीत जनता हा प्रश्न लोकप्रतिनिधींना आणि नेत्यांना विचारल्या शिवाय राहणार नाही अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे माजी सचिव नोवेल साळवे यांनी दिली.

Post a Comment

0 Comments