डोंबिवलीत गरीबांसाठी 'आपला जेवण' सेवा सुरू

 


डोंबिवली ( शंकर जाधव ) गरिबांना पोटभर जेवण मिळावं याउद्देशाने चार वर्षांपूर्वी डोंबिवली पूर्वेकडील स्टेशनजवळ लाल बावटा रिक्षा युनियन डोंबिवली आणि प्रमोद कोमास्कर स्मृती सेवा ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने आपल जेवणहा उपक्रम सुरू करण्यात आला होता.मात्र मार्च 2020 पासून करोना महामारीमुळे टाळेबंदी लागू झाल्यावर हा उपक्रम बंद करण्यात आला.       करोनाची तिसरी लाट असल्याचे राज्याचे आरोग्यमंत्री डॉ.राजेश टोपे यांनी प्रसारमाध्यमांना  सांगितले असले असून काही दिवसांपूर्वी निर्बंध शिथिल  केले आहेत.त्यामुळे दोन वर्षानंतर पुन्हा गरिबांसाठी 'आपलं जेवणसेवा सुरू झाली आहे.सोमवारी वाहतुक पोलीस निरीक्षक उमेश गित्तेरिक्षा युनियन अध्यक्ष कॉम्रेड काळू कोमास्कर,संजय मांजरेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत उपक्रमाची पुन्हा एकदा नव्याने सुरुवात झाली.   भाजप माजी नगरसेवक शैलेश धात्रक यांच्या वाढदिवसानिमित्त सोमवारी गरिबांना या उपकर्मातर्गत जेवण देण्यात आल्याचे कोमास्कर यांनी यावेळी सांगितले.या उपक्रमात गरिबांना जेवण देण्यासाठी शहरातील राजकीय नेतेमंडळीदानशूर व्यक्तींनी पुढे यावे अशी विंनती यावेळी उपस्थित मान्यवरांनी केली.

Post a Comment

0 Comments