सायन रुग्णालयातील कोरोना योद्ध्यांचा सन्मान

■आयएचसीएल आणि शेफ संजीव कपूर यांनी केला वैद्यकीय समुदायाचा गौरव ~


मुंबई, ११ मार्च २०२२ : जागतिक साथीची सुरूवात झाल्यापासून वैद्यकीय समुदाय देशातील प्रत्येक नागरिकाला सुरक्षित ठेवण्यासाठी आपले आयुष्य पणाला लावत आहेत. या साथीदरम्यान आघाडीवर राहून लढणाऱ्या वैद्यकीय समुदायाचा गौरव करण्यासाठी भारताची सर्वात मोठी हॉस्पिटॅलिटी कंपनी इंडियन हॉटेल्स कंपनी (आयएचसीएल) आणि शेफ संजीव कपूर होळी सणांचे औचित्य साधत 'हीलवुईथहोली' हा उपक्रम राबवत आहेत. 


      या उपक्रमाअंतर्गत आज कोरोना लढ्यात अविभाज्य भूमिका बजावणा-या लोकमान्य टिळक रुग्णालयातील (सायन रुग्णालय) कोरोना योद्ध्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी शेफ संजीव कपूर, आयएचसीएलचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. पुनीत छटवाल, सायन रुग्णालयाचे डीन डॉ. मोहन जोशी, डॉक्टर्स, परिचारिका आणि इतर कर्मचारी उपस्थित होते.


    ताज पब्लिक सर्व्हिस वेल्फेअर ट्रस्ट (टीपीएसडब्ल्यूटी), आयएचसीएल यांनी शेफ संजीव कपूर आणि भारतातील इतर भागीदारांच्या माध्यमातून भारतभरातील विविध शहरांमध्ये पोषक आहाराचे वितरण केले. 'मील्सटूस्माईल्स' उपक्रमांतर्गत १७ शहरांमधील ३८ रूग्णालयांमध्ये ४.५ दशलक्ष आहारांचे वाटप करण्यात आले आहे.


    शेफ संजीव कपूर म्हणाले की, “आपल्या आरोग्यसेवा समुदायाने जागतिक साथीच्या या अभूतपूर्व कालावधीत सेवा दिली आहे आणि ही बाब लक्षात घेऊन गौरव करण्याची गरज आहे. दोन वर्षांपूर्वी एक कल्पना म्हणून सुरूवात झालेल्या या उपक्रमाने चांगलाच वेग पकडला आहे आणि आहार पुरवण्याच्या देशस्तरीय उपक्रमात त्याचा विस्तार झाला आहे. या चांगल्या कार्यात आयएचसीएलसोबत भागीदारी करणे हा माझा गौरव असून त्यासोबत या लढ्यात अविभाज्य भूमिकेसाठी डॉक्टरांचा सन्मानही करण्यात येणार आहे. हील विथ होली हा डॉक्टरांप्रति कृतज्ञता दाखवण्याचा आणि त्यांच्या करूणा तसेच धाडसाला सलाम करण्याचा आमचा एक छोटा उपक्रम आहे.”


     आयएचसीएलचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. पुनीत छटवाल म्हणाले की, “आयएचसीएलला ‘मील्स टू स्माइल्स’ उपक्रमाद्वारे समाजाला सेवा देण्यासाठी गौरव वाटतो आहे. आम्ही बृहन्मुंबई महानगरपालिका, शेफ संजीव कपूर आणि आमच्या सर्व भागीदारांचे या प्रयत्नात आम्हाला मदत केल्याबद्दल आभार मानत आहोत. आम्ही वैद्यकीय समुदायाप्रति आमची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आणि त्यांच्या कार्याला सलाम करण्यासाठी उत्सुक आहोत.”

Post a Comment

0 Comments