डोंबिवलीत मनसेच्या वाहतूक शाखेतर्फे टेम्पो स्टॅन्डचे उद्घाटन


डोंबिवली ( शंकर जाधव ) डोंबिवलीतील महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक  सेनेतर्फे गोमंतक हॉटेलच्या बाजुला थ्री व्हीलर टेम्पो स्टॅन्डचे उद्घाटन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष प्रकाश भोईर, शहराध्यक्ष मनोज घरत तसेच शहर संघटक योगेश पाटील हार्दिक अध्यक्ष निषाद पाटील माजी उपविभाग अध्यक्ष संदीप म्हात्रे, विभाग अध्यक्ष प्रदीप चौधरी, उपविभाग अध्यक्ष विवेक भणगे यांच्या उपस्थितीत उद्घाटन करण्यात आले.


           यावेळी जिल्हाध्यक्ष  भोईर म्हणाले,  या ठिकाणी टेम्पोस्टॅन्डचे उद्घाटन झाले आहे तरी सर्व टेम्पो चालकांनी येथे शिस्तीचे सर्व नियम पाळून काम करावे. आपल्यावर काही अन्याय झाल्यास मनसे  आपल्या पाठीशी कायम राहील. परंतु संघटनेचे आणि पक्षाचे नाव खराब होईल असे कुणीही वागू नये. यावेळी सर्व टेम्पो चालकांच्या टेम्पो वरती मनसे वाहतूक शाखेचे स्टिकर लावण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments