शिवसेनेच्या वतीने कष्टकरी महिला आणि पोलिसांचा सन्मान


कल्याण : कल्याण पूर्वेत प्रभाग क्र. १०३ कैलासनगर शिवसेना शाखेच्या वतीने ८ मार्च रोजी जागतिक महिला दिनानिमित्त शिवसेना शाखेत कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी केडीएमसीच्या ड प्रभाग अधिकारी सविता हिले, डॉ. पूर्वा भानुशाली, डॉ. पवार, माजी नगरसेविका संध्या तरे यांच्याहस्ते प्रभागातील कष्टकरी, घरकाम करणाऱ्या महिलांचा आणि कोळसेवाडी पोलीस स्टेशनमधील महिला कर्मचाऱ्यांचा तुळशीचे रोप आणि शाल देऊन सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन शाखाप्रमुख दत्ताराम नार्वेकर व महिला आघाडीच्यावतीने करण्यात आले.


       कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कल्याण पूर्व महिला उपशहर संघटक मीना माळवे, शाखा संघटक जीवा जैन, मीना शिंदे, सुनिता माने तसेच शाखेतील महिला पदाधिकारी तसेच विभाग संघटक कमलाकर आगवणे, सुर्यकांत सोनावणे, अशोक बोराटे, सुरेश सोनावणे, बाळकृष्ण वराडकर, हरिराम सावंत, अनिकेत कदम, आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. 

Post a Comment

0 Comments