डोंबिवलीत कर्णबधीर – मुकबधीरांची क्रिकेट स्पर्धा पाहून सिंधुदुर्ग जिल्ह्यातहि होणार


डोंबिवली ( शंकर जाधव ) फलंदाजी,गोलंदाजी, क्षेत्ररक्षक करताना बोल नव्हे तर निरीक्षण महत्वाचे असते.आपल्यातील निरीक्षण क्षमतेवर खेळताना कर्णबधीर – मुकबधीरांची क्रिकेट स्पर्धा डोंबिवलीकरांसाठी आकर्षक ठरली.विशेष म्हणजे कर्णबधीर – मुकबधीर मुलींनीही बाजी मारत सामना चांगलाच रंगवला.रविवारी डोंबिवली पश्चिमेकडील कान्होजी जेधे ( भागशाळा )  डोंबिवलीतील कर्णबधीर – मुकबधीरांची क्रिकेट स्पर्धा भरवली होती. क्रिकेटचे सामने पाहण्यासाठी क्रिकेटप्रेमींनी मैदानात गर्दी केली होती. हे सामने पाहण्यासाठी आलेल्या सिंधुदुर्गातील एका समाजसेवकाने तेथेही कर्णबधीर – मुकबधीरांची क्रिकेट स्पर्धा आयोजित करू असे आश्वासन दिले.

 

             ओमकार कर्णबधीर विकास संस्था डोंबिवली आणि रोटरी क्लब ऑफ डोंबिवली सनसिटी यांच्यासंयुक्त विद्यामाने कर्णबधीर – मूकबधीरांच्या एकदिवसीय भव्य बॉक्स क्रिकेट स्पर्धा भरवली होती. शिक्षण मंडळाचे माजी उपसभापती तथा युवक कॉंग्रेस कमिटी डोंबिवली शहर सचिव अमित म्हात्रे यांनी स्पर्धेचे आयोजन केले होते. स्पर्धेत मुंबई. ठाणे,डोंबिवली, बदलापूर येथील अनेक कर्णबधीर – मुकबधीरांनी भाग घेतला.  कर्णबधीर – मुकबधीर मुलींची  क्रिकेट खेळताना फलंदाजी, गोलंदाजी करताना पाहुन उपस्थिती क्रिकेटप्रेमींनी टाळ्याच्या गजरात त्यांचे मनोबल वाढवले.यावेळी अमित म्हात्रे म्हणाले,येथील क्रिकेट स्पर्धा पाहून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एका समाजसेवकाने तेथे कर्णबधीर – मुकबधीरांची क्रिकेट स्पर्धा आयोजित करू असे सांगितले.


        शिक्षण मंडळाचे उपसभापती असताना कर्णबधीर – मुकबधीरांच्या संपर्कात आलो.गेली १० वर्ष या मुलांसाठी अनेक समाजिक उपक्रम केले.दोन वर्षापूर्वी या मुलांसाठी फुटबॉल स्पर्धा आयोजित केली होती.तसेच दिव्यांग मुलांना शासनाकडून मदत मिळावी यासाठी पाठपुरावा केला.पालिका हद्दीतील दिव्यांगांची नोंद करणे बंधनकारक असल्याने तशी माहिती कर्णबधीर –मुकबधीर मुलांना दिली. त्यानुसार पालिकेकडे फोर्म भरून दिले. आयोजकांनी स्पर्धेतील विजेत्या संघाला ट्रॉफी आणि प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित केले.

Post a Comment

0 Comments