खिंडीपाडा येथे १७८ निरंकारी भक्तांचे उत्साहपूर्ण रक्तदान


कल्याण : संत निरंकारी मिशनच्या वतीने रविवारी संत निरंकारी सत्संग भवनखिंडीपाडा येथे एका भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले ज्यामध्ये १७८ निरंकारी भक्तांनी मोठ्या उत्साहाने रक्तदान केले. संत निरंकारी रक्तपेढीविले पार्लेमुंबई यांनी या रक्तदान शिबिरामध्ये रक्त संकलनाचे कार्य पार पाडले.


      ‘रक्त नाड्यांमध्ये वाहावे, नाल्यांमध्ये नको’ या सद्गुरुच्या शिकवणूकीचा अंगीकार करत संत निरंकारी मिशनकडून मुंबई महानगर प्रदेशामध्ये रक्तदानाची एक अविरत श्रृंखला चालविण्यात येत आहे ज्यामध्ये जवळपास दर आठवड्याला रक्तदान शिबिराचे आयोजन केले जात आहे. हे रक्तदान शिबिरही याच श्रृंखले अंतर्गत आयोजित करण्यात आले. या शिबिरामध्ये खिंडीपाडा, भांडूप तसेच मुलुंड परिसरातील निरंकारी भक्तगणांनी मोठ्या उत्साहाने भाग घेतला.


      रक्तदान शिबिराचे उद्घाटन स्थानिक आमदार रमेश कोरगांवकर यांच्याहस्ते करण्यात आले. मंडळाचे स्थानिक सेक्टर संयोजक श्रीधर पाटील तसेच अनेक शाखांचे प्रबंधक व सेवादल अधिकारी याप्रसंगी उपस्थित होते.  या शिबिराला सदिच्छा भेट देणाऱ्या मान्यवरांमध्ये मा.नगरसेवक तथा उप विभाग प्रमुख सुरेश शिंदेनगरसेविका संगीता गोसावी आणि अशोक पाटील आदींचा समावेश होता. सर्व मान्यवर व्यक्तींनी संत निरंकारी मिशनच्या समाज व मानवतेच्या प्रति निष्काम सेवांचे कौतुक केले. 


      या शिबिराचे यशस्वी आयोजन मंडळाचे स्थानिक मुखी गिरधारी भक्तानी यांनी स्थानिक सेक्टर संयोजक यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक सेवादल युनिट आणि संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनच्या स्वयंसेवकांच्या सहयोगाने केले.

Post a Comment

0 Comments