कल्याण पूर्व शिवसेना शहर शाखेच्या वतीने शिवजयंती निमित्त भव्य मिरवणूक


कल्याण : गेल्या दोन वर्षाच्या कोरोना कालखंडानंतर या वर्षी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या  जन्म तिथी नुसार सोमवारी सायंकाळी शिवसेना कल्याण पूर्व शहर शाखेच्या विद्यमाने शिव प्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यात आली. शिवसेना सह संपर्क प्रमुख शरद पाटील यांच्या प्रमुख पुढाकाराने या मिरवणूकीचे आयोजन करण्यात आले होते.


 

जाईबाई साईनगर प्रभागातील शिवसेना शाखे पासुन सुरु झालेली ही मिरवणूक कैलाश नगरसाईबाबा नगरखडेगोलीवली मार्गे हनुमान नगरहून काटेमानिवली चौक ते गणेश मंदीर चौकसिद्धार्थ नगरम्हसोबा चौकतिसगांव नाक्याहून पूणे लिंक रोडवरून चक्की नाक्यावर पोहचल्यानंतर या मिरवणूकीचा समारोप करण्यात आला. या मिरवणूकीत शिवाजी महाराजांच्या प्रतिमेच्या अश्वरथासह ब्रॉस बँडशालेय विद्यार्थ्यांचे लेझीम पथकघोडेस्वार महिला६ बैल गाड्यादांड पट्टा कलाकार आदींचा सहभाग होता.


 

गेली दोन वर्ष नागरीक कोरोनाने त्रस्त होते. आता कल्याण डोंबिवली महापालिका परिसरातील कोरोना रुग्ण संख्या शून्यावर आली असल्याने नागरीकांत उत्साह निर्माण झाला आहे. दोन वर्षाच्या खंडा नंतर निघालेल्या या मिरवणूकीत शिव प्रेमी नागरीकांची उपस्थिती लक्षणीय असल्याची माहिती सह संपर्क प्रमुख शरद पाटील यांनी दिली.


 

या मिरवणूकीसाठी आमदार विश्वनाथ भोईर, नगरसेवक मल्लेश शेट्टी, निलेश शिंदे यांचे विशेष सहकार्य लाभले. यावेळी सहसंपर्क प्रमुख शरद पाटील यांच्यासह माजी महापौर रमेश जाधव, माजी नगरसेवक हर्षवर्धन पालंडेविशाल पावशेमहादेव रायभोळेदेवानंद गायकवाडशरद पावशे, माजी नगरसेविका सुशिला माळीशितल मंढारीतसेच रमाकांत देवळेकरराधीका गुप्तेभारती जाधव, कामेश जाधव, धनराज पाटील, भूषण यशवंतराव, तेजस देवकाते, सुरेश जाधव, तेजस्वी पाटील,संगीता गायकवाड, स्नेहा पिंगळे आदी शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Post a Comment

0 Comments