भास्कर वाघमारे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) ठाणे शहर(जिल्हा) अध्यक्ष पदी


ठाणे , प्रतिनिधी  : आगामी महापालिका निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. प्रमुख राजकीय पक्षांच्या बरोबरीने वाटचाल करताना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाने ( आठवले )  आपली शक्ती दाखवून देण्यासाठी ठाणे शहर पातळीवर महत्वपूर्ण बदल  करताना पक्षाच्या ठाणे शहर (जिल्हा) अध्यक्षपदाचा जबाबदारी भास्कर वाघमारे यांच्यावर सोपवली आहे. 


        रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आठवले) ठाणे शहरातील संघटक, पदाधिकारी आणि प्रमुख कार्यकर्ते यांची एक बैठक अलीकडेच पार पडली. पक्षाचे राष्ट्रीय सचिव आणि ठाणे - पालघर जिल्हा निरीक्षक सुरेश बारसिंग यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत पुढील काळात होणारी महापालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेवून पक्षाची संघटनात्मक बांधणी करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यावेळी सर्वाना बरोबर घेऊन पक्षाचा अजेंडा राबविण्यात अग्रेसर असणाऱ्या भास्कर वाघमारे यांची अध्यक्षपदी निवड करण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला. यावेळी पक्षाची ठाणे शहर कार्यकारिणी घोषित करण्यात आली. 


          यावेळी बोलताना भास्कर वाघमारे म्हणाले, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाने मोठी जबाबदारी सोपवली आहे. पक्षाची ध्येयधोरणे तळागाळातील जनतेपर्यंत पोहचवून मित्र पक्षांच्या साथीने ठाणे महापालिकेत बहुजन समाजाचा नगरसेवक महापौरपदी बसवू. पक्षाचे राष्ट्रीय सचिव सुरेश बारसिंग म्हणाले, एवढी वर्ष ठाणे महापालिकेवर एकाच पक्षाची सत्ता आहे. असे असूनही त्या पक्षाच्या मंत्र्यांना पालिकेतील भूखंड घोटाळ्याचे चौकशी आदेश द्यावी लागतात ही दुदैवाची बाब आहे. तर भास्कर वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली पक्षाची आक्रमक वाटचाल होईल असा विश्वास पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केला.


          ठाणे शहर कार्यकारिणी :


भास्कर वाघमारे (अध्यक्ष), प्रल्हाद मगरे ( कार्याध्यक्ष), प्रमोद इंगळे (महासचिव), मंगेश सादरे (संघटक सचिव),  बापू मखरे, शहाजी दुपारगुडे, बबन केदारे ( सर्व उपाध्यक्ष), तात्याराव झेंडे (सचिव,प्रसिद्ध प्रमुख)बालाजी नारायणकर ( सचिव), विकास चव्हाण (प्रवक्ता),  दत्तू जानराव  ( सल्लागार),  ओबीसी आघाडी - एकनाथ भगत( प्रमुख), ठाणे शहर महिला आघाडी : मनिषाताई करलाद (अध्यक्ष), विमलताई सातपुते ( उपाध्यक्ष).युवा आघाडी : विनोद भालेराव ( अध्यक्ष), विशाल ढेंगळे ( कार्याध्यक्ष), अशोक कांबले (महासचिव) बाबा भदरगे ( उपाध्यक्ष),

Post a Comment

0 Comments