डोंबिवली शिवजयंतीला शिवसेनेच्या वतीने भव्य देखावा आणि शिवकालीन शस्त्रांचे प्रदर्शन


डोंबिवली ( शंकर जाधव ) छत्रपती शिवाजी महाराज जयंतीदिनी शिवसैनिक  संदेश पाटील यांच्या संकल्पेतून डोंबिवली पश्चिमेकडील गोपीनाथ चौकात छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य देखावा आणि नेत्रदीपक विद्युत रोषणाई ककरण्यात आली.यावेळी शिवाजी गोसावी यांचे शिवचरित्र व्याख्यान आयोजित केले होते.तसेच शिवकालीन शस्त्रांचे प्रदर्शन भरविण्यात आले होते. शालेय विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक आणि महिलांनी शस्त्र पाहताना आपल्या मोबाईल मध्ये हे चित्र टिपून घेतले.

  

     शिवसेना उपशहर संघटक हरीशचंद्र पाटील, शिवसैनिक संदेश पाटील आणि रसिका पाटील यांसह अनेक शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकांनी अथक मेहनत घेतली.गोपीनाथ चौकात भरविलेल्या शिवकालीन शस्त्रांचे प्रदर्शनात पालकांनी पाल्यांना आवर्जून आणले होते. शस्त्र माहिती देताना पालक आपल्या पाल्यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात या शस्त्रांचा युद्धात वापर कसा होत होता यांची माहिती देत होते. यावेळी  शिवसैनिक संदेश पाटील म्हणाले,आजच्या पिढीला छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास माहित असणे आवश्यक आहे.


       शस्त्र प्रदर्शन भरविताना हाच उद्देश समोर ठेवला होता.शिवाजी गोसावी यांचे शिवचरित्र व्याख्यानातून नागरिकांना संपूर्ण इतिहास सांगण्यात आला. डोंबिवलीत एवढा मोठा देखावा पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती.या देखाव्याची चर्चा शहरभर सुरु होती. शिवसेना शहरप्रमुख राजेश मोरे यांनी देखावा आणि शस्त्र प्रदर्शन पाहून संदेश पाटील यांचे कौतुक केले.  

Post a Comment

0 Comments