वंचित समूहातील जास्तीत जास्त महिलांनी राजकारणात आले पाहिजे - रेखा ठाकूर महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी

 


कल्याण : वंचित समूहातील जास्तीत जास्त महिलांनी राजकारणात आले पाहिजे असे आवाहन वंचित बहुजन आघाडीच्या  महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर यांनी केले आहे. युनायटेड नेशन्स तर्फे प्रसिद्ध केल्या जाणाऱ्या मानवी विकास अहवालात महिला विकासाच्या जागतिक क्रमवारीत २०१८ च्या अहवालात भारताचा क्रमांक १६७ देशात १५२  वा आहे. म्हणजे या यादीत खालून १५ वा क्रमांक आहे. या क्रमवारीत प्रथम स्थानी कुवेत या अरब देशाचा आहे.  भारतीय महिलांचे मागासलेपणा  दाखवणारी ही आकडेवारी बहुसंख्य महिला शिक्षणआरोग्यस्वच्छता या मूलभूत नागरी सुविधांपासून आजही वंचित असल्याचे दर्शवते.
    


   मूलभूत प्राथमिक सुविधांपासून मागास समूहातील स्त्रिया वंचित आहेत कारण त्या निर्णय प्रक्रियेपासून दूर आहेत व त्यामुळे त्यांचा देशाच्या साधनसामुग्रीतील न्याय्य हिस्सा त्यांना नाकारला जात आहे. हा हिस्सा राजकारणात आल्या शिवाय या महिलांना मिळणार नाही. वंचित महिलांच्यावरील लैंगिक अत्याचाराची समस्याही गंभीर आहे. सामाजिक व लैंगिक अत्याचार व भेदभाव दूर करण्यासाठी देखील राजकीय सत्ता महत्त्वाची आहे. भारतीय महिला राजकारणा पासुन दूर आहेत कारण महिलांना सत्ता देऊ नये अशी मनुस्मृतीची व्यवस्था होती त्यापासून आजही समाजात बाहेर पडलेला नाही.
 
महिलांना नाकारलेला राजकीय सहभाग मिळवून देण्याची वंचित बहुजन महिला आघाडीची भूमिका आहे व त्या साठी खासकरुन दलित आदिवासी ओबीसी मुस्लीम महिलांना संघटित करून सत्तेत नेण्यासाठी आम्ही काम करत असल्याची माहिती रेखा ठाकूर यांनी दिली.

Post a Comment

0 Comments