कल्याण : पडघा वनक्षेत्र मधील किरवली परिमंडळ मधील मौजे कुशीवली गावात वृक्ष दिंडी व जनजागृती सभा गावदेवी मंदिरात घेण्यात आली. या प्रसंगी स्थानिक पोलीस पाटील अंकिता पाटील यांच्या हस्ते पालखीमध्ये वट वृक्षाचे रोपटे ठेऊन पूजन करण्यात आले. त्यानंतर संपूर्ण कुशिवली गावात पालखी फिरवून ठिकठिकाणी महिलांनी रांगोळ्या काढून पालखी पूजन केले. लहानमुले वृक्ष विषयी घोषणा देत होते.
त्यानंतर सदर वृक्ष दिंडी कार्यक्रमाचे जनजागृती सभेत रूपांतर झाले. याप्रसंगी हनुमान ट्रस्ट दाभाड चे अध्यक्ष शांताराम पाटील, ग्रुप ग्रामपंचायत आवळे विश्वगडचे सरपंच तथा जेएफएम अध्यक्ष अनंता जाधव, तसेच श्रमजीवी संघटनेचे सक्रिय कार्यकर्ते अनंता पाटील यांनी मार्गदर्शन पर भाषणे केली. या कार्यक्रमात वनविभागाला वनसंरक्षण व वनसंवर्धन क्षेत्रात उत्कृष्ठ कामगिरी करणाऱ्या स्थानिक नागरिकांना सन्मान म्हणून वनपरिक्षेत्र कार्यालय पडघा तर्फे प्रशस्तीपत्र देण्यात आले.
या प्रसंगी साहेबराव खरे वनपाल किरवली यांनी सूत्रसंचालन केले. तसेच दिलीप माळी यांनी देखील भरीव मदत केली. या ठिकाणी श्याम चतुरे, वनपाल दिघाशी, वनरक्षक दिघाशी विलास सकपाळ यांनी विशेष परिश्रम घेतले. त्याच बरोबर अंकुश पाटील, दीपक जाधव, मिलिंद पाटील, शांताराम जाधव, लहू जाधव यांनी उपस्थित राहून सहकार्य केले. यावेळी महिलांची लक्षणीय उपस्थिती होती. शेवटी या वट वृक्षाचे रोपटे मंदिर समोर आवारात लावून वृक्षारोपण करण्यात आले.
0 Comments