विविध अडचणींचा सामना करून रिक्षाचालक करतात रिक्षांची पासिंग

■कोकण विभाग रिक्षा टॅक्सी महासंघाने केली पांसिग ट्रँकची पाहणी


कल्याण : रिक्षाची पासिंग करतांना रिक्षा चालकांना विविध अडचणींचा सामना करावा लागत असून याबाबतच्या तक्रारी रिक्षा चालकांकडून प्राप्त झाल्यानंतर कोकण विभाग रिक्षा टॅक्सी महासंघाचे अध्यक्ष प्रणव पेणकर यांनी पदाधिकाऱ्यांसमवेत  कल्याण पूर्वेतील नांदिवली येथील पांसिग ट्रँकची पाहणी केली. यावेळी त्यांनी पासिग़ंला आलेल्या रिक्षा चालकांना येणार्‍या अडचणी समजुन घेतल्या. यावेळी सुभाष पेणकर, जितु पवार, संतोष नवले, नुर जमादार, शेखर जोशी, गजानन पाटील, भुषण वैराळ, पिकिं भूल्लर आदींसह बहुसंख्य स्टॅण्ड पदाधिकारी व रिक्षा चालक उपस्थित होते.


      कल्याण पूर्वेतील नांदिवली येथे असलेल्या आरटीओच्या पासिंग ट्रँकवर कल्याण सह ठाणे आरटीओ अंतर्गत येणाऱ्या वाहनांची पासिंग केली जाते. मात्र येथे पासिंग साठी येणाऱ्या रिक्षाचालकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. त्याचप्रमाणे विविध कारणांसाठी याठिकाणी येणाऱ्या रिक्षाचालकांची लुट देखील करण्यात येते. याबाबत कोकण विभाग रिक्षा टॅक्सी महासंघाने याठिकाणी पाहणी करून रिक्षाचालकांच्या समस्यांबाबत उपस्थित अधिकाऱ्यांची चर्चा करून या समस्या लवकरात लवकर सोडविण्याची मागणी करण्यात आली आहे.    


यामध्ये रिक्षा पांसिगच्या वेळेस सॅनीटायझर व रिप्लेक्टर पट्टीच्या नावे आर्थिक लुट बंद करा. नांदिवली येथे पांसिग ट्रँकवर रिक्षा व वाहने पांसिगं वेळी शौचालयपिण्याचे पाणीउन वारा पाऊस संरक्षण निवारा शेडसुरक्षा कुपंणसुरक्षा रक्षक सर्व पायाभूत सोयीसुविधा उपलब्ध करून द्या. रिक्षा पांसिग साठी वेळ निश्चित करुन टोकण पध्दत सुरू करा. रिक्षा पांसिगं ट्रॅकवर वेळेचा अपव्यय टाळण्यासाठी एकाच वेळी दोन रिक्षा तपासणी व पांसिग करा. 


रेग्युलर पांसिगं थांबवून  शनिवार व सुट्टीच्या दिवशी हजारो रुपये जादा घेऊन रिक्षा पांसिगं करणे बंद करा. रिक्षा पांसिग करीता मध्य राञी पासुन दिवसभर रिक्षा चालकांना ताटकळत ठेवणे बंद करा. रिक्षा पांसिग जलद गतीने होणे कामी उपाययोजना व आँनलाईन स्लाँट विनाविलंब वाढवा. आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या.

Post a Comment

0 Comments