बच्चेकंपनीच्या हस्ते बालक मंदिरशाळेच्या नूतनीकरण वास्तूचे उद्घाटन

■अभ्यास करतांना प्रसन्न वाटावे यासाठी शाळेचे नूतनीकरण..


कल्याण : बालक मंदिर संस्थेच्या इंग्रजी माध्यमाच्या प्री प्रायमरी विभागाच्या वास्तूचे नूतनीकरण करण्यात आले आहे. बच्चेकंपनीच्या हस्ते नुकतेच या वास्तूचे उद्घाटन करण्यात आले.


कोरोना रुग्ण संख्या कमी झाल्याने निर्बंध शिथिल कारण्यात आले आहेत. यामध्ये शाळा देखील सुरु झाल्या असून शाळेत येणाऱ्या या विद्यार्थ्यांना अभ्यास करतांना प्रसन्न वाटावे यासाठी शाळेचे नूतनीकरण करण्यात आले आहे. शाळेच्या इमारतीत आता सहा वर्गखोल्या असून प्रत्येक वर्ग उत्तमरित्या सजविण्यात आला आहे. मुलांच्या भावविश्वाचा विचार करून या वर्गांमध्ये सोयी सुविधा पुरविण्यात आल्या आहेत. यासाठी कल्याण डोंबिवली परिसरातील नामवंत चित्रकारांनी मुलांना आकर्षित करणारी चित्रे प्रत्येक भिंतीवर काढली आहेत.


 शाळेत ठिकठिकाणी लावलेल्या कटआऊट स्वरूपातील चित्रांनी संपूर्ण सजावटीत विशेष रंग भरले आहेत. इमारतीच्या तिन्ही मजल्यांना अशाप्रकारे नवा साज चढवण्यात आला आहे. शाळेच्या विद्यार्थ्यांनी या सर्व सजावटीला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. तर सर्व पालकांनी देखील या नूतन वास्तू बद्दल समाधान व्यक्त केले आहे.

Post a Comment

0 Comments