आहेत का फुटपाथ, कल्याण डोंबिवलीत? डोंबिवलीकरांचा प्रशासनाला प्रश्न


डोंबिवली ( शंकर जाधव ) कल्याण डोंबिवलीत  रस्ते, वाहतूक कोंडी, सिग्नल यंत्रणा, वाहतूक सेवा अश्या अनेक समस्या सुटल्या नसून त्यात फुटपाथवर अतिक्रमण हा अनेक वर्षांपासून प्रश्न प्रशासन सोडवू शकला नाही.'आहेत का फुटपाथ, कल्याण डोंबिवलीत?असा प्रश्न डोंबिवलीकरांकडून विचारला जात आहे.पालिका प्रशासन फुटपाथवरील अतिक्रमण थांबवू शकत नसल्याने आता सामान्य नागरिकांनी पुढाकार घेऊन 'मग मिळवू या का आपले फुटपाथ परत' असे ठरविले आहे.


              MH05 वाहतूक संघटने फुटपाथ अतिक्रमण थांबवण्यासाठी पुढाकार घेतला आहे.नागरिकांनी, कल्याण डोंबिवलीत जास्तीत जास्त फुटपाथ चा उपयोग करायचा आहे .फुटपाथ वरून चालतनाचा फोटो काढून, पत्ता सकट आपल्या गृप व पेज वर पोस्ट करायचा आहे. फुटपाथ अतिक्रमण आहेत का, किंवा इतर काही बाबी असल्यास पोस्ट मध्ये थोडक्यात माहिती द्यायची.. ३० सेकेंड चा व्हिडियो काढून पोस्ट करा, नाव व पत्ता लिहावा.आपण फुटपाथ वरून चाललो तरच फुटपाथ आपल्याला मिळतील. 


       नाही तर अतिक्रमण होईल.अश्या प्रकारची दोन दिवसीय मोहीम संघटनेच्या वतीने सुरु केल्याचे वंदना सोनवणे यांनी सांगितले.डोंबिवली पूर्व व पश्चिमेकडील स्टेशनबाहेरील फुटपाथ  वरील अतिक्रमण दिवसेंदिवस वाढत आहे.यावर सामाजिक माध्यमातून नागरिकांनी फुटपाठवरील अतिक्रमणाचे फोटो टाकण्यास सुरुवात केली आहे.वास्तविक पालिकेच्या फेरीवाला हटाव पथकाने आपले काम व्यवस्थित केल्यास नागरिकांना फुटपाथवर चालण्यास जागा मिळू शकते.


        डोंबिवली पश्चिमेला स्टेशनबाहेर सर्व फुटपाथवर अशीच परिस्थिती दिसते.मात्र येथील फेरीवाला हटाव पथकाने कारवाई करत नसल्याने नागरिकांनी पथकाच्या कामकाजावर नाराजी व्यक्त केली आहे.डोंबिवली पश्चिमेकडील फेरीवाला हटाव पथकातील काही कर्मचाऱ्यांना डोंबिवली पूर्वेकडील 'ग'किंवा 'फ' प्रभाग बदली हवी असून त्यांनी तशी शिफारसीसाठी प्रयत्न केल्याची चर्चा कर्मचाऱ्यांमध्ये सुरू झाली आहे.


       'ग' आणि 'फ' प्रभागात फेरीवाला पथकात बदली करून घेण्यास कर्मचारी का इच्छुक आहेत याबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे. फुटपाथवरील अतिक्रमण आणि फेरीवाला मुक्त स्टेशनपरिसर करण्यास पालिका प्रशासन अपयशी झाल्याचे यावरून दिसून येते.

Post a Comment

0 Comments