केडीएमसीच्या कंत्राटी कामगारांची ठेकेदाराकडून पिळवणूक

■करारात नमूद  वेतनापेक्षा कमी वेतन मिळत असल्याचा कर्मचार्याचा आरोप


कल्याण :  केडीएमसीच्या काही प्रभागात कचरा उचलण्याचे काम ठेकेदारामार्फत केले जात आहे. संबंधित ठेकेदार हा कर्मचाऱ्यांना केडीएमसीच्या करारात नमूद वेतनापेक्षा कमी वेतन देत असल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी केलाय. याबाबत कर्मचाऱ्यांनी माहितिच्या आधिकारात माहिती काढत ही बाब केडीएमसीच्या निदर्शनास आणून दिली मात्र केडीएमसी कडून नोटीस पलीकडे ठेकेदारावर अद्याप काहीच कारवाइ न केल्याने कर्मचाऱयानी संताप व्यक्त केलाय.


कर्मचाऱ्यांनी आम्हाला किमान वेतन आयोगानुसार वेतन तसेच बोनस देण्यात यावा अशी मागणी केडीएमसी प्रशासनाकडे केली आहे. याबाबत केडीएमसीचे घनकचरा विभागाचे उपायुक्त रामदास कोकरे यांनी संबंधित ठेकेदाराला जो निविदा दर निश्चित झाला आहे त्यानुसार महापालिका वेतन अदा करते, याबाबत संबधीत ठेकेदार आणि कर्मचाऱ्यांना समोरा समोर बोलावून चर्चा करत तोडगा काढण्यात येईल तसेच कर्मचाऱ्याच्या तक्रारीची शहानिशा करत कारवाई करण्यात येईल असे सांगितले.


कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील काही प्रभाग क्षेत्रात खाजगी ठेकेदारामार्फत कचरा उचलण्यात येतो. विशाल एक्सपर्ट अस या ठेकेदाराचे नाव असून कचरा उचलण्यासाठी घंटागाड्या आणि आरसी गाड्यावर १५०  चालक आणि ३५० सफाई कामगार नेमण्यात आले होते. मागील ४ वर्षापासून हे कर्मचारी शहरातील कचरा उचलण्याचे काम करत असून  किमान वेतन आयोगानुसार वाचनचालकांना सुमारे १७ हजार तर सफाई कामगारांना सुमारे  १८ हजार वेतन मंजूर करण्यात आले आहे. महापालिकेकडून निविदेत मंजूर वेतनाप्रमाणे  दरमहा सुमारे ५००  कामगारांचे वेतन ठेकेदाराला दिले जाते. मात्र  ठेकेदाराकडून  कामगारांना अत्यल्प मोबदला दिला जात असून १७  हजाराच्या ऐवजी चालकाच्या हातात अवघे १० हजार रुपये मानधन दिले जात असल्याचा आरोप केला आहे.


किमान वेतन आयोगा नुसार पगार मिळावा यासाठी कंत्राटी कर्मचारी केडीएमसी व ठेकेदाराचे उंबरठे झिजवत आहेत. मात्र अद्यापही या कर्मचाऱयाच्या हातात अवघा १० ते ११ हजार दरम्यान पगार येतो हा पगार देखील नियमित येत नाही. पीएफच्या खात्यात ही पैसे वर्ग केले जात नसल्याचा आरोप कर्मचाऱ्यानी केला आहे. याबाबत केडीएमसीचे घनकचरा विभागाचे उपायुक्त रामदास कोकरे यांनी संबंधित ठेकेदाराला जो निविदा दर निश्चित झाला आहे त्यानुसार महापालिका वेतन अदा करते, याबाबत संबधीत ठेकेदार आणि कर्मचाऱ्यांना समोरा समोर बोलावून चर्चा करत तोडगा काढण्यात येईल तसेच कर्मचाऱ्याच्या तक्रारीची शहानिशा करत कारवाई करण्यात येईल असे सांगितले. 

Post a Comment

0 Comments