नेस कॅफेच्या जाहिरातीसाठी टिटवाळ्यातील खेळाडूंची निवड


कल्याण : नेस कॅफे या आंतरराष्ट्रीय कंपनीने नवीन जाहिरात प्रसिद्ध करण्याचे ठरविले आहे. ज्यात अनेक कलाकार देखील सहभाग घेणार आहेत. या जाहिरातीची थीम हि क्रीडा विशेष असल्यामुळे सदर जाहिरातींसाठी खेळाडूंची निवड करणारी टीम अतिशय चांगल्या प्रकारे कराटे या क्रीडा प्रकारात नैपुण्य प्राप्त केलेल्या ८ ते १४ वर्ष वयोगटातील खेळाडूंच्या शोधात होते.

          
           टिटवाळा येथे विनायक मार्शल आर्ट्स अँड फिटनेस झोन येथे मुख्य प्रशिक्षक विनायक कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेत असलेल्या ८ ते १४ वर्षे वयोगटातील ११ कराटे खेळाडूंची या नेस कॅफेच्या जाहिरातींसाठी निवड करण्यात आली आहे. मृण्मयी भोजने, मौसम सिंग, प्रकृती साहू, तनिष्का डोंगरे, समृद्धी जोशी, कृतिका कोळी, शोएबा खान, अश्विनी पाटिल, दिशिका कोळी आणि ईश्वरी गायकवाड हि निवड झालेल्या कराटे खेळाडूंची नावे आहेत.


           टाटा मोटर्सने या पूर्वी केलेल्या टाटा हॅरीयर या गाडीच्या जाहिरातींसाठी देखील टिटवाळ्यातील ३ कराटे खेळाडूंनी सहभाग घेतला होता ज्यात गौरी तीटमे,  हर्षदा पाडेकर आणि आकांक्षा जाधव यांनी या जाहिरातीमध्ये महत्त्वाची भुमिका बजावली होती. आता पुन्हा एकदा मिळालेल्या या संधीचे हे खेळाडू नक्कीच सोने करतील यात मात्र शंका नाही.


          क्रीडा क्षेत्रातील केलेल्या आपल्या मेहेनतीच्या जोरावर या युवतींना विविध जाहिरातीमध्ये स्थान मिळत आहे. येत्या ७  मार्च रोजी गोरेगाव मुंबई येथे नेस कॅफे च्या जाहिरातीचे चित्रीकरण करण्यात येणार असल्याची माहिती विनायक कोळी यांनी दिली.

Post a Comment

0 Comments