महिलांनी आरोग्या बाबत घ्यावयाची काळजी` या विषयावर मार्गदर्शन


डोंबिवली ( शंकर जाधव ) जागतिक महिला दिनी सर्वत्र विविध कार्यक्रम आयोजित केले होते.डोंबिवलीतील भाजप माजी नगरसेवक विकास म्हात्रे आणि माजी नगसेविका कविता गोराख  म्हात्रे यांनी डोंबिवली पश्चिमेकडील कुंभारखानपाडा येथील सरोवरनगर येथे महिलांसाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी तज्ञ डॉक्टरांनी महिलांना आयोग्याची काळजी घेण्याविषयी मार्गदर्शन दिले.तर प्रभागातील राहत असलेल्या महापौर पुरस्कार विजेत्या माजी मुख्याध्यापिका शालिनी भांडारे यांनी या कार्यक्रमात हे दोन प्रभाग म्हणजे मुंबईतील स्मार्ट सिटी  असल्याचे यावेळी सांगितले.


    भाजप माजी नगरसेवक विकास म्हात्रे आणि कविता म्हात्रे प्रभागात यांच्यावतीने जागतिक महिल दिन  साजरा करण्यात आला. याच प्रभागात राहत असलेल्या महापौर पुरस्कार विजेत्या माजी मुख्याध्यापिका भंडारे म्हणाल्या, मी येथील महिला मंडळात कार्यरत आहे.पूर्वीचा प्रभाग आणि आताचा प्रभाग यात खूप फरक दिसतो.उत्तम रस्ते, वृक्षांची निगा, नागरिकांच्या समस्यांना प्राधान्य या व अश्या अनेक कामांसाठी भाजप माजी नगरसेवक विकास म्हात्रे आणि माजी नगरसेविका कविता म्हात्रे पुढाकार घेतात. प्रभागातीलच  नव्हे इतर प्रभागातील महिलांना जनसंपर्क कार्यालयात माहिती दिली जाते. 


       शिक्षिका असलेल्या कल्पना श्रीवास्तव यांनी त्यांच्या कार्याबाबत कार्यक्रमात कौतुक केले. तर भाजप सदस्या मृणाल जोशी यांनी `महिलांनी आरोग्याबाबत घ्यावयाची काळजी` या विषयावर मार्गदर्शन केल्याचे सांगितले. यावेळी भाजप माजी नगरसेविका रेखा असोदेकर यासह महिला कार्यकर्त्यांनी कार्यक्रमात उपस्थिती दर्शविली.यावेळी उपस्थित महिलांना सॅनेटरीने पॅडचे वाटप  करून कार्यक्रमाची सांगता केली.

Post a Comment

0 Comments