पत्रीपुलाच्या नालेसफाईकडे केडीएमसीचे दुर्लक्ष परिसरात रोगराईचे प्रमाण वाढले


कल्याण : पत्रिपूल येथील मुख्य नाला बरेच दिवसापासून भरलेला आहे. त्यामुळे आजूबाजूच्या परिसरात भयंकर मच्छर वाढले आहे. यामुळे परिसरात डेंगू, मलेरिया, टाइफाइड असे आजार पसरले आहेत. या आजारांमुळे कुणाची जीवितहानी होऊ नये आणि अशा आजारांना प्रतिबंध घालण्यासाठी या नाल्याची साफसफाई करणे आवश्यक आहे.

 
नागरिकांच्या आरोग्याचा विषय लक्षात घेऊन या नाल्याची ताबडतोब साफसफाई न झाल्यास परिसरातील लोकांना सोबत घेऊन आंदोलन करण्यात येईल असा इशारा कॉंग्रेसचे कार्यकर्ते शकील खान यांनी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेला दिला आहे. 

Post a Comment

0 Comments