१४ महिन्याच्या बालकाला टेम्पोने चिरडले बल्याणी येथील घटनेत बालकाचा दुर्दैवी मुत्यु

  


कल्याण : बल्याणीत एका १४ महिन्याच्या बालकास टेम्पोने चिरडल्याची धक्कादायक घटना घडल्याचा प्रकार उजेडात आला असून याप्रकरणी टिटवाळा पोलिसांनी गुन्हा दाखल केला असुन या दुर्दैवी घटनेत उपाचाराअंती बालकाचा मुत्यु  झाला असून हा घातपाताचा प्रकार असावा असा सशंय व्यक्त होत आहे.


सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार टिटवाळा मधील बल्याणी परिसरात असलेल्या रहीस चाळ जवळ एका मार्बल दुकानात आलेल्या एका टेम्पोने परिसरात खेळणाऱ्या तीन बालकापैकी १४ महिन्याच्या बालकास चिरडल्याची घटना घडली आहे. या घटनेत या १४ महिन्याचा आरसलाम शहा या बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. सी.सी टीव्हीत सदर घटना कैद झाली असल्याचे दिसते.


  ही घटना २४ मार्च रोजी सकाळी दहाच्या सुमारास घडली आहे. या घटनेची माहिती टिटवाळा पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत टेम्पो चालका विरोधात गुन्हा दाखल करत टेम्पोचालक सैफ फारुखीला अटक केली आहे. मात्र न्यायालयाने  सैफ फारुखीला जमिनीवर सोडले असल्याचे समजते. टिटवाळा पोलीस स्टेशन चे पीएसआय दिलीप देशमुख या घटने बाबत आधीक तपास करीत आहेत.

Post a Comment

0 Comments