डोंबिवली , येथील पूर्वेकडील स्टेशनबाहेरील परिसरात फेरीवाल्यांच्या शिवशक्ती मित्र मंडळाच्या वतीने बर्फाचे शिवलिंग बनविण्यात आले आहे.बर्फाच्या शिवलिंगाचे दर्शन घेण्यासाठी भक्तगणांनी गर्दी केली होती.२०१५ साली बर्फाचे शिवलिंग बनविल्यानंतर दरवर्षी महाशिवरात्रनिमित्त असेच शिवलिंग बनविले जात आहे.
अध्यक्ष गजानन व्यापारी, कार्याध्यक्ष शुक्लप्रसाद यादव, उपाध्यक्ष संदीप जयस्वाल, खजिनदार प्रमोद यादव यांसह मनिष यादव, अजित यादव, पवन सैनिक, सिकंदर पठाण, बाबू नायडू आणि भावेश टर्नर या सदस्यांनी अथक मेहनत घेतली.काही भाविक आपल्या मोबाईल मध्ये बर्फाच्या शिवलिंगाचे फोटो काढत होते.तर मंडळाचे सदस्य नागरिकांना मोफत सरबत देत होते.
0 Comments