सर्प मित्रां कडून एकाच दिवशी ४ सापांची मुक्तता


कल्याण उन्हाच्या काहिलीने समस्त प्राणी मात्रांच्या जीवनावर विपरीत परिणाम होऊ लागला आहे. साप हा थंड ठिकाणी राहणारा प्राणी असल्याने गर्मीच्या ठिकाणांहून थंड ठिकाणी वास्तव्य करण्याकरिता विषारी आणि बिनविषारी सर्प बाहेर पडू लागल्याचे गुरूवारी दिवसभरात मानवी वस्तीतून  पकडलेल्या लागोपाठ ४  सापांवरून स्पष्ट झाले आहे.


गुरूवारी सकाळी नऊ वाजता कल्याण-मुरबाड रोडला असलेल्या सेंचुरी कंपनीतून फोन आला. एक नाग पकडल्याचे कळताच सर्पमित्र दत्ता बोंबे यांनी घटनास्थळी जाऊन खात्री केली. अत्यंत घातक अशा कोब्रा नागाला बिर्ला स्कूल येथून सेंचुरीच्या फायरने पकडून आणले होते. या नागाला घेऊन कल्याणच्या वन विभागाकडे आणण्यात आले. वन अधिकाऱ्यांना कळविल्यात आले. 


कल्याण जवळच्या उंबर्डे येथील डम्पिंग रोडच्या बाजूला साईटचे काम चालू आहे. त्यांच्या ऑफिसजवळ 4 फुटी  विषारी घोणस आली होती. साईटवर असलेल्या बंटी नावाच्या व्यक्तीने कॉल केला होता. त्यानंतर अर्ध्या तासाने उंबर्डे शंकर मंदिराजवळ घराच्या भिंतीमध्ये धामण जातीचा साप होता त्यालाही पकडून बॅगेत ठेवण्यात आले.


आधारवाडी तुरूंग अधिक्षकांच्या बंगल्यामागे रसेल कुकरी नावाचा साप पकडण्यात आला. तोही बिनविषारी साप होता. या सर्व सापांना वन खात्याला दाखवून नंतर निसर्गात मुक्त करण्यात येणार असल्याचे सर्पमित्र दत्ता बोंबे यांनी सांगितले. गुरूवारी सकाळपासून चार साप आढळून आले. यात एक इंडियन कोब्रा नागएक विषारी घोणसएक धामण आणि एक रसेल कुकरीचा समावेश आहे.


 साप हा शेतकऱ्यांचा मित्र मानला जातो. कोणताही साप विषारी असतोच असे नाही. त्यामुळे कुठेही साप वा तत्सम प्राणी आढळून आल्यास त्यांना दुखापत करू नये. तात्काळ प्राणी-सर्प मित्रांशी संपर्क साधावाअसे आवाहन दत्ता बोंबे यांनी केले आहे. तर सर्व सापांना वन विभागाच्या परवानगीने निर्सगाच्या सानिध्यात सोडणार आल्याची माहिती सर्पमित्र दत्ता बोंबे यांनी दिली आहे.

Post a Comment

0 Comments