ठाण्यात महापालिकेत सत्ता आली तर ओ.बी.सीचा महापौर - नाना पटोले


ठाणे, प्रतिनिधी  : येत्या काही दिवसांतच ठाणे महानगर पालिकेच्या निवडणुका आहेत काँग्रेस पक्षाची सत्ता आली तर सर्वात पहिला महापौर कीवा उपमहापौर हा ओबीसी समाजातीलच असेल असा निर्धार काॅग्रेस प्रदेशाध्यक्ष नानासाहेब पटोले यानी ठाण्यात केला.


         महाराष्ट्र प्रदेश ओ.बी.सी.विभागाच्या वतीने ठाण्यात भव्य रॅली व एन के टी सभागृहात ओ.बी.बाधवाचा मेळावा आयोजित करण्यात आला होता या प्रसगी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष नानासाहेब पटोले यांनी पत्रकाराशी बोलताना सांगितले की,एखाद्याने टिका केली तर त्याच्या विरोधात व्यक्तीगत जाऊन कारवाई करणो हे लोकशाहीला न परवडणारे आणि भुषणावही देखील नाही. 


         त्यामुळे केंद्रातील भाजपला आम्ही सल्ला देत आहोत की हे या ब्लॅकमेलींगच्या धंद्यातून बाहेर, केंद्रात आलेल्या भाजप सरकारला सत्तेचा माज आहे. तो कमी करावा अशी मागणी कॉंग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.


            महाराष्ट्र प्रदेश ओबीसी विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्याच्या निमित्ताने पटोले ठाण्यात आले होते. यावेळी कॉंग्रेस कार्यालय ते जिल्हाधिकारी कार्यालय या मार्गावर रॅलीही काढण्यात आली होती.या रॅलीत महाराष्ट्र प्रदेश ओ.बी सी विभाग अध्यक्ष भानुदास माळी,ठाणे काँग्रेस अध्यक्ष अॅड.विक्रांत चव्हाण,प्रदेश सचिव मनोज शिदे,ठाणे ओ.बी.सी.विभाग अध्यक्ष राहुल पिंगळे,कोकण विभाग अध्यक्ष पल्लवी रेणके आदि सहभागी झाले होते.


             त्यानंतर आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्याला पत्रकारांशी बोलतांना त्यांनी भाजपवर टिका केली.अधिवेशनात लोकांच्या प्रश्न मांडले जावेत,सोडविले जावेत अशी अपेक्षा असते. मात्र भाजपची गोंधळ निर्माण करण्याची मानसिकता असेल तर तो त्यांचा भाग आहे.


           मात्र विरोधकांनी प्रश्न उपस्थित करावेत सरकार उत्तरे देण्यास सज्ज असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.केंद्रातील भाजप सरकार हे कोरोनाच्या काळ असेल दुस:या लाटेचा प्रभाव असेल किंवा युक्रेन आणि रशियामध्ये सुरु असलेल्या युध्द असेल या काळात देशाचे पंतप्रधान हे पाच राज्याच्या निवडणुकीत व्यस्त होते.


           त्यात मंगळवारी एका मुलाचा मृत्यु देखील झाला.येथे शिक्षणासाठी गेलेल्या इतर देशांनी आधीच मायदेशात आणले.मात्र मोदींना उशिराने जाग आल्याचेही त्यांनी सांगितले. मात्र आता उशिर झाला असला तरी देखील ही सर्व मुले सुरक्षित भारतात यावीत ही कॉंग्रेसची इच्छा असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. 


          एकूणच केंद्रातील भाजप सरकार हे सत्तेचा दुरपोयग करण्याचे काम करीत असून भाजप सर्वात मोठी भ्रष्टाचार करणारी पार्टी देशात असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी यावेळी केला. दि. बा. पाटील यांचे नाव नवी मुंबई विमान तळाला द्यावे यासाठी निवदेन प्राप्त झालेले आहेत.त्यानुसार सरकाराने त्याचा सकारात्मक विचार व्हावा अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.


         यावेळी त्यांना देवेंद्र फडणवीस यांच्यावरुन छेडले असता,वेळ आल्यावर त्यांच्यावर बोलेन असेही त्यांनी स्पष्ट केले.ओबीसी बाबत उद्या निकाल येणे अपेक्षित आहे.परंतु ठाणो महापालिकेच्या निवडणुकीत कॉंग्रेसची सत्ता आली तर ओबीसीचाच महापौर व उपमहापौर येथे बसेल.असा दावा त्यांनी यावेळी केला. 


          आता ओबीसींच्या भावना जाणून घेतल्या असून हा समाज आता कॉंग्रेसच्या बाजूने उभा होत असल्याचेही त्यांनी सांगितले.आगामी निवडणुकीच्या निमित्ताने आधीच आम्ही आमची भुमिका स्पष्ट केलेली आहे. त्यानुसार व्युव्ह रचना आखली जात असल्याचेही त्यांनी शेवटी स्पष्ट केले.

Post a Comment

0 Comments