इमारतीचा स्लॅब पडल्याने २ जण जखमी कल्याण पूर्वेतील चिंचपाडा येथील घटना


कल्याण : इमारतीचा स्लॅब पडल्याने २ जण किरकोळ जखमी झाल्याची घटना कल्याण पूर्वेतील चिंचपाडा येथे घडली आहे. हि इमारत अवघ्या ३ ते ४ वर्षे जुनी असून देखील या इमारतीचा स्लॅब पडल्याने इमारतीच्या बांधकामाच्या  दर्जाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होते आहे. स्लॅब पडण्याची हि घटना याआधी देखील घडली होती मात्र विकासक या इमारतीच्या दुरुस्तीकडे लक्ष देत नसल्याने येथील रहिवाशांनी पालिका प्रशासनाकडे धाव घेत  या विकासकावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.


      कल्याण पूर्वेतील चिंचपाडा गाव, चेरोबा चौक येथे बबन अपार्टमेंट मध्ये दोन इमारती असून यातील बी विंग मध्ये तिसर्या मजल्यावर प्रवीण कुमार कोणार यांचे कुटुंब राहतात. मंगळवारी रात्री कोणार कुटुंबीय जेवत असताना त्यांच्या अंगावर स्लॅब कोसळला यात नालाथाई कोणार आणि निलेशकुमार कोणार हे दोघे जखमी झाले आहेत. याबाबत स्थानिकांनी विठ्ठलवाडी पोलीस स्टेशन मध्ये त्याची सूचना देण्यात आली असून, त्यांची मेडिकल तपसणी देखील झाली आहे. हे घडले असतानाच बुधवारी सकाळी देखील या घरातील स्लॅब पडल्याने कोणार कुटुंबीय भयभीत झाले आहेत.  इमारतीमधील इतर रहिवासी देखील जीव मुठीत घेऊन जगत आहेत.


मागे सहा महिन्या पूर्वी सुद्धा हिच घटना घडली होती. या इमारतीचे बांधकाम पूर्ण होऊन फक्त ३ते ४ वर्षे झाले असूनकाही काम विकासकाकडून अपूर्ण आहेत,  त्यामुळे संपूर्ण इमारती मध्ये गळती किंवा प्लास्टर पडणे अश्याया बर्याच गोष्टी वारंवार घडत आहेत. याबाबत विकासकाला अर्ज देऊन सुद्धा काम करून मिळत नसल्यामुळे येथील रहिवाशांनी पालिकेच्या आय प्रभाग सहाय्यक आयुक्तांकडे, विठ्ठलवाडी पोलीस स्टेशन आणि कल्याण पूर्वचे आमदार गणपत गायकवाड यांच्याकडे तक्रार अर्ज करत सहकार्य करण्याची मागणी केली आहे.

Post a Comment

0 Comments