सर्व आरोग्य अधिकारी,कर्मचारी यांचे कार्य कोतुकास्पद.... महापौर प्रतिभा विलास पाटील


भिवंडी, प्रतिनिधी : गेली दोन वर्षे आपण कोरोना चा सामना करतोय या महा भयंकर साथीच्या अशा आजारातून अंत्यंत कठीण काळात सर्व वैद्यकीय आरोग्य विभागाचे कर्मचारी यांनी आपला जीव धोक्यात घालून फारच   चांगले काम केले आहे. विशेष करून  सर्वेक्षण काम करणाऱ्या आशा वर्कर , अंगणवाडी सेविका, आरोग्य सेविका,  आरोग्य परिचारिका,  यांचे कार्य अधिक कौतुकास्पद आहे असे गौरवोद्गार महापौर प्रतिभा विलास पाटील यांनी काढले. 

  

            16 मार्च राष्ट्रीय लसीकरण दिवसाचे औचित्य साधून पालिकेच्यावतीने राष्ट्रीय लसीकरण दिवस ओस्वाल महाविद्यालयाच्या सभागृहात साजरा करण्यात आला, यावेळी महापौर प्रतिभा विलास पाटील बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे, स्थायी समिती सभापती संजय म्हात्रे, सभागृह नेते सुमित पाटील, भाजपा गटनेते हनुमान चौधरी, वैद्यकीय अधिकारी कारभारी खरात, ओसवाल महाविद्यालयाचे अध्यक्ष भरत भाई शहा , सेक्रटरी जयंतीलाल सुमारिया, खजिनदार हेमल शहा, प्राचार्य मितेश गोसरानी , आरसीएच अधिकारी वर्षा बारोड,  क्षय रोग अधिकारी बुशरा सय्यद,  वैद्यकीय अधिकारी जयवंत धुळे,  जनसंपर्क अधिकारी मिलिंद पळसुले इत्यादी उपस्थित होते. 

  

         महापौर प्रतिभा विलास पाटील पुढे म्हणाल्या की, आज राष्ट्रीय लसीकरण दिवसाचे महत्त्व  आहे. सर्व वैद्यकीय आरोग्य विभाग यांचे  आजच्या या दिवशी सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन करणे आवश्यक आहे. आपण सर्वांनी अनेक अडचणींवर मात करत सर्व प्रकारच्या लसीकरणाचे उद्दीष्ट पूर्ण करण्याकरिता प्रत्यन करीत आहात ही बाब निश्चितच चांगली आहे.  आजचा हा दिवस सर्व आरोग्य कर्मचारी,  शास्त्रज्ञ, वैद्यकीय अधिकारी यांचे करता कृतज्ञता दिन आहे. आपण सर्वांनी नियमित लसीकरण करणे कामी प्रचार-प्रसार करणे आवश्यक आहे.  


        मिशन इंद्रधनुष्य हा लसीकरणाचा मोठा उपक्रम आहे  4 एप्रिलपासून मिशन इंद्रधनू विशेष लसीकरण मोहीम अंतर्गत ज्या बालकांनी अद्याप कोणतीही लस घेतलेली नाही किंवा लस घायची राहून गेले आहेत त्यांच्या पालकांना या मोहिमेत लस घेता येणार आहे. या मोहिमेत आपल्या बालकांना लस द्यावी असे आवाहन देखील महापौर प्रतिभा विलास पाटील यांनी सर्व शहरवासीय  यांना केले.  महापौरांच्या हस्ते  आशा वर्कर, आरोग्य सेविका, आरोग्य परिचारिका, वैद्यकीय आरोग्य अधिकारी यांचा पुष्गुच्छ व प्रशस्तीपत्रक देऊन गौरव करण्यात आला.  यावेळी अतिरिक्त आयुक्त प्रकाश दिवटे यांनी सांगितले की, आपण सर्वांनी  अतिशय कठीण काळात मानवाची सेवा केलेली आहे. 


            आपण सर्वजण मानवतेचे काम करीत आहात, आपण सर्वजण समाजाप्रती ऋणी आहोत.  यावेळी डॉक्टर खरात यांनी वेगवेगळ्या लसीकरणाचे महत्त्व नमूद केले, आजही लोक अजून लसीकरण करून घेणेस तयार नाहीत त्यांना लसीकरण करणे कामी प्रवृत्त करणे आवश्यक आहे.डॉक्टर बारोड यांनी 16 मार्च या लसीकरण दिवसाचे महत्त्व आपल्या प्रास्ताविकात नमूद केले. तर डॉक्टर जयवंत धुळे यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.

Post a Comment

0 Comments