महाराष्ट्र असोसिएशन फॉर कानोईग अँड कयाकिंग अध्यक्ष पदी समीर मुंणगेकर


कल्याण : महाराष्ट्र असोसिएशन फॉर कानोईग अँड कयाकिंग या राज्य संघटनेची वार्षिक सर्वसाधारण सभा व पंचवार्षिक निवडणूक नुकतीच पार पडली. निवडणुकीसाठी निवडणूक अधिकारी म्हणून निवृत्त न्यायाधीश के.डी. भोसले,  इंडियन कनोईग अँड कायाकिंग असोसिएशनचे निरीक्षक महेश पिंपलकर व महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे निरीक्षक दयानंद कुमार उपस्थित होते.


वार्षिक सर्वसाधारण सभा निवृत्त उपसंचालक साईचे वीरेंद्र भांडारकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. महाराष्ट्र राज्यातील संलग्न जिल्हा संघटना व सभासद यांच्या उपस्थितीमध्ये नवीन कार्यकरणीची बिनविरोध निवड करण्यात आली. यामध्ये अध्यक्षपदी समीर मुंणगेकर, उपाध्यक्षपदी प्रताप जामदारबाळासाहेब कांबळे, सचिव सुरेंद्र कोरेसहसचिव श्रीनिवास पवारखजिनदार हेमंत पाटीलसदस्य दत्ता पाटील, गणपती बरगाले, नितीन शेटे, इस्माईल शेख, ज्योती निळे यांचा समावेश आहे.


अध्यक्ष यांनी आपल्या अभिभाषणात कनोईंग अँड कयाकिंग या ऑलम्पिक दर्जाच्या खेळाचा प्रचार व प्रसार होण्यासाठी विविध धोरणांची घोषणा केली. तसेच कयाकिंग आणि कनोईग या क्रीडा प्रकारांची राष्ट्रीय खेळाडू व मराठी अभिनेत्री स्मिता गोंदकर यांची कानोईग अँड कायाकिंग नवीन या खेळाचे महाराष्ट्र राज्याचे ब्रँड ॲम्बेसीडर म्हणून नेमणूक केली.


 हा खेळ महाराष्ट्र राज्या मध्ये तळागाळापर्यंत तसेच सामान्य खेळाडू पर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनची मिनी ऑलम्पिक व ऑलिम्पिक स्पर्धेच्या अनुषंगाने कयाकिंग व कनोईग या खेळासाठी दर्जेदार सुविधा व प्रशिक्षण केंद्र तयार करू असे अध्यक्ष समीर मुणगेकर यांनी सांगितले.


दरम्यान यावेळी ठाणे जिल्हा कायाकिंग व कनोईंग असोसिएशनचे सचिव अजित कारभारी (राज्य युवा पुरस्कारार्थी) व खजिनदार विनायक कोळी (राज्य युवा पुरस्कारार्थी) यांचाही सन्मान करण्यात आला.

Post a Comment

0 Comments