ऑल इंडिया स्टेशन मास्टर असोसिएशनच्या वतीने स्टेशन मास्टर महिलांचा सन्मान


कल्याण : आंतरराष्ट्रीय महिला दिन एका खास थीमवर ऑल इंडिया स्टेशन मास्टर असोसिएशनच्या वतीने साजरा होत असतो. कल्याण स्थानकातही नारीशक्तीचा गौरवपूर्ण गजर करण्यात आला. ऑल इंडिया स्टेशन मास्टर असोसिएशनच्या वतीने  ममता व मातृत्वाचे प्रतीक असलेल्या महिलांच्या कार्यकर्तृत्वाला सलाम करण्यात आला. मध्य रेल्वेच्या मुंबई डिव्हिजन मध्ये काम करणाऱ्या 29 स्टेशन मास्टर महिलांच्या आपल्या कार्यातून कर्तृत्वाचा ठसा उमटविणाऱ्या नारीशक्तींचा गुणगौरव कल्याण स्टेशन मॅनेजर कार्यालयात करण्यात आला.


       महिला दिनाच्या निमित्ताने त्यांचे अनन्यसाधारण महत्त्व पटवून देण्यासाठी त्यांचा हा दिवस साजरा करणं गरजेचं आहे. अस सांगत मुंबई मंडळाचे मुमेंट इन्स्पेक्टर सत्यव्रत महापात्रा यांनी महिलांना आज एकविसाव्या शतकात देखील समानता मिळत नसल्याची खंत व्यक्त केली. ते ऑल इंडिया स्टेशन मास्टर असोसिएशनच्या वतीने आयोजित जागतिक महिला दिनाच्या निमित्त त्री शक्तीच्या जागर कार्यक्रमाच्या माध्यमातून बोलत होते.


त्याच बरोबर महिलांनी स्वत: ला सिद्ध करायचे असेल तर अंगी जिद्द आणि चिकाटी बाळगणे गरजेचे आहे. प्रत्येक महिलांनी आत्मनिर्भर होणे देखील तितकेच गरजेचे आहे. जेणेकरून कुठल्याही क्षेत्रामध्ये महिलांना माघार घेण्याची वेळ येणार नाहीतसेच कोणावर अवलंबून राहण्याची गरज पडणार नाहीअसे सांगत उप स्टेशन मॅनेजर धनश्री गोडे यांनी आजची महिला संघटिकरण आणि सबलीकरण होणे गरजेचे आहे. 


त्यांच्यासाठी अनेक योजना शासन दरबारी घेतल्या जातातमात्र प्रत्येक महिला पर्यंत या योजना पोहचत नसल्याने त्यांच्या प्रगतीच्या वाटा खुंटल्या जात आहेत. आज सर्व क्षेत्रात महिलांनी बाजी मारली आहेमात्र तरी देखील त्या स्वतःला असुरक्षित समजत आहेत. हे चित्र बदलण्याची वेळ आली आहे. महिला प्रत्येक क्षेत्रात स्वतःला सुरक्षित समजू लागली की खऱ्या अर्थाने महिला दिनाचे सार्थक होईल.

Post a Comment

0 Comments