कळवा बुधाजी नगर येथे जागतिक महिला दिन उत्साहात साजराकळवा , अशोक घाग :  कळवा विभागातील बुधाजी नगर येथे श्रीमती प्रमिला केणी यांच्या मार्गदर्शनाखाली जागतिक महिला चे औचित्य साधून श्रमिक व कर्तृत्वान महिलांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला त्याप्रसंगी माजी नगरसेविका मनाली मिलिंद पाटील उपस्थित होत्या.


         कोरोना ची सात सुरू झाली तेव्हापासून दिवस-रात्र 24 तास रुग्णसेवा देणाऱ्या महिला डॉक्टर नर्स व वेटलिफ्टिंग या खेळामध्ये जागतिक पातळीवर गोल्ड मेडल पटकावणारी स्पोर्ट मॅन गर्ल चार्टर्ड अकाउंटंट तसेच लॉन्ड्री व्यवसायामध्ये सक्षम कार्यरत करणारी महिला आणि ठाणे महानगरपालिकेच्या घनकचरा विभागातील श्रमिक महिला अशा विविध क्षेत्रातील कर्तुत्ववान महिलांचा श्रीमती प्रमिलाताई केणी व मनाली पाटील यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.


         त्याप्रसंगी प्रमिलाताई म्हणाला की आजच्या युगातील महिला पुरुषांसोबत  प्रत्येक क्षेत्रामध्ये अग्रेसर आहेत डॉक्टर्स वकील पायलट पोलीस कलेक्टर बँक क्षेत्रामध्ये छोट्या छोट्या व्यवसायामध्ये कोरोना च्या दोन वर्षाच्या कालावधीमध्ये संसाराचा गाडा सांभाळताना खरी कसरत ही महिलांचीच होती महागाई वाढली आहे .


         दैनिक जीवनामध्ये दररोजच्या लागणाऱ्या वस्तूंच्या किमती भरमसाठ वाढला असताना सुद्धा न डगमगता घर संसार चालवणारी   सक्षम महिलाच असते    कितीही मोठे संकट आले तरीसुद्धा प्रत्येक संकटाला सामोरे जाण्याची क्षमता ही फक्त महिला मध्येच आहे.

Post a Comment

0 Comments