शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत निवासी शिबिरात व्यसनमुक्तीवर मार्गदर्शन


कल्याण : औद्योगिक प्रशिक्षण संस्था मुंबई येथील राष्ट्रीय सेवा योजनांचा सात दिवसीय निवासी शिबिर विश्र्वात्मक जंगली महाराज आश्रम मोहाली तालुका शहापूर येथे आयोजित करण्यात आले होते. यावेळी प्रमुख पाहुणे व मार्गदर्शन  नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य चे पालघर जिल्हा संघटक मिलिंद पाटील यांनी "व्यसनमुक्ती " या विषयावर मार्गदर्शन केले.   


मिलिंद पाटील यांनी मार्गदर्शनात व्यसनांमुळे माणसास शारीरिकमानसिक व सामाजिक दुष्परिणामांना तोंड द्यावे लागते. दारूगुटखातंबाखूसेगरटअमली पदार्थांचे सेवन व त्यांचे दुष्परिणाम या विषयावर मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात येते. तंबाखू च्या सेवनाच्या चक्र व्यूहातून तरूण पिढीला बाहेर काढूननिकोटीन व तंबाखूच्या व्यसनापासून प्रतिबंध करणे. ही या वर्षी ची जागतिक आरोग्य संघटनेची मुख्य संकल्पना आहे.


 देशात प्रत्येक १६ सेकंदाला एक मूल तंबाखूचे पहिल्यांदा सेवन करतो तर दर दिवशी हा आकडा ५,५००  मुलांपर्यंत जातो. या व्यसनाच्या दुष्टचक्र यापासून अलिप्त ठेवण्यासाठी प्रत्येक शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये तंबाखूविरोधी मानसिकता निर्माण करणे,  तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांच्या व्यसनांचा समाजावर मोठा परिणाम होत आहे. अनेकांना कर्करोगासारख्या आजारांना सामोरे जावे लागत आहे.  विद्यार्थ्यांनी व्यसन केल्यास त्याचा परिणाम आरोग्यासह शिक्षणावरही होत असल्याचे मिलिंद पाटील यांनी सांगितले.


यावेळी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था मुंबईचे प्राचार्य आर. बी. भावसार,  राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. सुनिल दहिवलकर प्रा. फिलीप डिसोझा व राष्ट्रीय सेवा योजनेचे १०५ युवकांनी सहभाग घेतला. यावेळी कार्यक्रमाची सांगता व्यसनमुक्तीची शपथ घेऊन करण्यात आली.

Post a Comment

0 Comments