शिवजयंतीला भाजपच्या वतीने भव्य देखावा

 


डोंबिवली ( शंकर जाधव ) भाजपा डोंबिवली पश्चिम उपाध्यक्ष हरीश जावकर यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जंयतीदिनी डोंबिवली पश्चिमेकडील भाजप जनसंपर्क कार्यालयात श्री सत्यनारायण महापूजा आणि कार्यालयासमोर भव्य देखावा करण्यात आला होता.आमदार रविंद्र चव्हाण, कल्याण जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे, कृष्णा पाटील यांसह अनेक पदाधिकाऱ्यांनीछत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केले.


        येथील देखावा पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती.यावेळी जावकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची माहिती शालेय विद्यार्थ्याना दिली. दरवर्षी भाजपच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जंयती साजरी केली जात असल्याचे जावकर यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments