ईडीच्या कारवाई विरोधात राष्ट्रवादीचा निषेध मोर्चा


कल्याण : राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने केंद्रीय तपास यंत्रणा (ई. डी.) ने चालविलेल्या  सूडबुद्धीने केलेल्या कारवाई विरोधात प्रांत कार्यालयावर निषेध मोर्चा काढण्यात आला. हा मोर्चा राष्ट्रवादी सरचिटणीस सुदाम पाटील आणि जिल्हा उपाध्यक्ष आर. एन. यादव यांच्या  नेतृत्वाखाली काढण्यात आला.


 यामध्ये ताहीर पटेल जिल्हा कार्याध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेसविजय चव्हाण विधानसभा अध्यक्ष, नेहा पाटील जिल्हाध्यक्षा महिला राष्ट्रवादी काँग्रेस, महिला राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा कार्याध्यक्ष शशिकला सिह, माजी जिल्हा परिषद सदस्य महादेव पाटील, नगरसेवक विजय खानावकरजिल्हा महिला कार्याध्यक्ष अनुराधा रंगारी, माजी सरपंच परशुराम सुरते, राजू मुलानी, अमित लोखंडेविनीत कांडपीलेज्ञानेश्वर पवार, चंद्रकांत नवलेबळीराम नेटके, सुनील मोहोडजेष्ठ नागरिक अध्यक्ष आबा लबडेजिल्हा अध्यक्ष स्वप्नील काटकर यांच्यासह शेकडो कार्यकर्ते या मोर्चात सहभागी झाले होते. 

Post a Comment

0 Comments