कोळी महासंघा कडून लोनाड चौधरपाडा ग्रामपंचायत मधील सरपंच, उपसरपंचांचा सत्कार


कल्याण : कल्याण नजीक आसलेल्या लोनाड चौधरपाडा ग्रुप ग्रामपंचायत सरपंचपदी कोळी समाजाच्या  नवरत्ना भंडारी व उपसरपंचपदी कोळी समाजाचे लक्षमण भंडारी यांची नुकतीच बिनविरोध निवड झाली आहेत्यामुळे कोळी समाजामध्ये आनदांचे वातावरण पसरले आहे कोळी समाजाकडून अभिनंदन होत आहेकोळी महासंघाचे उपनेते देवानंद भोईरकोळी महासंघाच्या कल्याण तालुका अध्यक्षा वर्षा कोनकर यांनी कोळी महासंघाच्या वतीने सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.


यावेळी कोळी महासंघाचे उपनेते देवानंद भोईर यांनी सांगितले की, कोळी महासंघाचे अध्यक्ष व आमदार रमेश पाटील हे स्वता उपस्थित राहणार होते. अधिवेशन आसल्यामुळे ते येवु शकत नाही, परंतु त्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत सरपंच नवरत्ना भंडारी व उपसरपंच लक्षमण भंडारी हे दोन्ही कोळी समाजाचे आहेत. जनतेच्या विश्वासाला तडा जावू न देता विकासकामे पूर्ण करण्यासाठी दोघांनी पाठपुरावा केला पाहिजे. कोळी समाजाच्या डचणी सोडविल्या पाहीजेत असे सांगितले.


नवनिर्वाचित सरपंच नवरत्ना भंडारी व उपसरपंच लक्षमण भंडारी यांनी सांगितले की अपूर्ण कामे पूर्ण करणार असून विविध विकास योजना राबविणार असून सर्व सदस्यांचे आम्हाला सहकार्य मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी सुरेश भंडारीसंतोष अटाळकर, विश्वास मढवीअनंता तरेयुवराज वाकडे यांच्यासह कोळी समाजाचे बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments