वाचन मंदिरचा भारतरत्न लता मंगेशकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली पर कार्यक्रम, शुद्ध चारित्र्य स्वाभिमानी स्त्री जाणीव म्हणजे लता मंगेशकर...प्रज्ञा जोशी


ठाणे, प्रतिनिधी  : भारतीय  हिंदी व मराठी  चित्रपट व संगीत सृष्टीवर खऱ्या अर्थाने लता मंगेशकर यानी  आपले वर्चस्व प्रस्थापित केले. भारतीय चित्रपटसृष्टीचा सुवर्णकाळ म्हणजेच लता मंगेशकर.  चित्रपटसृष्टीतल्या कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता त्यांनी आपलं चारित्र्य चांगल्या प्रकारे जपत, संगीत क्षेत्राला उच्च पातळीवर नेले. लता मंगेशकर यांनी स्वाभिमानी स्त्रीची सर्व मर्यादा याची जाणीव ठेवत त्यांनी , चित्रपट सृष्टीवर राज्य केले  असे उद्गार साहित्यिका, लता मंगेशकर यांच्या अभ्यासक प्रज्ञा जोशी यांनी काढले. 


       वाचन मंदिराच्या वतीने संस्थेच्या 159 व्या वर्धापन   दिनानिमित्ताने आणि आठ मार्च जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत लता मंगेशकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली चा कार्यक्रम आयोजित टिळक मंदिर सभागृहात आयोजित केला होता त्या वेळेला भारतरत्न लता मंगेशकर एक अदभुत रसायन, स्वाभिमानी स्त्री जाणीव या विषयावर प्रज्ञा जोशी बोलत होत्या, अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष सुधीर सिंगासणे होते.


        आपला मुद्दा पुढे मांडताना जोशी म्हणाल्या की, चित्रपट क्षेत्रात  पुरुषी वर्चस्वाला महत्व आहे पण लता मंगेशकर यांनी त्याला छेद दिला , कोणत्याही  प्रकारला  डगमगल्या नाहीत, महिला कलाकार यांच्या बाबतीत  वेळोवेळी कणखर भूमिका घेतली. स्त्रीचा हक्काची व सर्व कलाकारांच्या हक्काची जाणीव त्यांनी ठेवली. कलाकाराला मिळणारे मानधन याबाबत इत्यादी वेळोवेळी आवाज उठवला. 


       चित्रपट सृष्टीत पूर्वी गायकाला मानसन्मान मिळत नसे तो मानसन्मान मिळवून देण्याचं काम लता मंगेशकर यांनी केलेले आहे. लतादीदींचं गाणं म्हणजे देव, देश,भक्ती प्रेम याचा एकत्रित संगम होय. मराठी संत साहित्य, छत्रपती शिवाजी महाराज यांचे कर्तृत्व , समर्थ रामदास यांचे शब्द,  स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी लीहलेल्या अनेक कविता यांना   आपल्या सुमुधुर आवाजाद्वरे  उच्च दर्जा मिळवून देण्याचा काम लताबाईंनी केलं.


       त्यांचं मराठी भाषेवरचं प्रेम, क्रिकेट वरील प्रेम, सामाजिक जबाबदारीची जाणीव यातून त्यांनी महाराष्ट्रातील सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात वेगळा असा खास ठसा  उमटविला. या प्रसंगी प्रज्ञा जोशी, अंजली घुगारे, पूजा ब्ल्लेवार यांनी लता दीदी यांनी गायलेली गाणी सादर केली. कार्यक्रमाचे प्रास्तविक सहकार्यवाह मिलिंद पळसुले, यांनी केले तर ज्ञानेश्वर गोसावी यांनी आभार मानले.

Post a Comment

0 Comments