दोघांमध्ये झालेल्या वादातून कार चालकाने एकाला नेलं फरफटत कल्याणच्या आधारवाडी चौकात घडली घटना


कल्याण : भर चौकात दोघांमध्ये वाद झाल्यानंतर हा वाद इतक्या विकोपाला गेलाकी कार चालकाने गाडीसमोर उभं राहून भांडणाऱ्या दुसऱ्या तरुणाला गाडीसोबत फरफटत नेले. कल्याण  पश्चिमेतील आधारवाडी चौकात हा अंगाचा थरकाप उडवणारा प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेचा थरार मोबाईल कॅमेरात कैद झाला असून व्हिडिओ  चांगलाच व्हायरल झाला आहे. वाहतूक पोलिसांनी या प्रकरणी कारवाई केली आहेमात्र शहर पोलीस या प्रकरणात काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


कल्याण पश्चिमेतील आधारवाडी चौकात सिग्नल लागला होता. वाहन चालक सिग्नल ग्रीन होण्याच्या प्रतिक्षेत होते. इतक्यात बाईकस्वार व्यक्ती एका कार समोर उभा राहिला आणि त्याने कारवर मारायला सुरूवात केली. हे दृश्य एका नागरिकाने पाहिले आणि काही अनुचित प्रकार घडू शकतोया संशयातून त्याने हा प्रकार मोबाईलमध्ये कैद करण्यास सुरुवात केली.


काही वेळाने सिग्नल सुटला असता कार चालकाने समोर उभ्या असलेल्या व्यक्तीला चक्क काही अंतरावर फरफटत नेले. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. याच वेळी वाहतूक पोलिसांनी व्हिडिओच्या आधारे कार शोधून काढत गुन्हा दाखल केला. प्रवीण चौधरी असं या कार चालकाचं नाव आहे. 


या प्रकरणी वाहतूक पोलिसांनी प्रवीण विरोधात कारवाई केली आहे. मात्र शहर पोलिसांनी देखील कारवाई केली पाहिजे होती. हा प्रकार खडकपाडा पोलीस ठाण्याच्या अंतर्गत घडला असून पोलीस काय कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Post a Comment

0 Comments