फर्मच्या भागीदारां सोबत कट रचल्या प्रकरणी चार्टर्ड अकाउंटंट विरोधात गुन्हा


कल्याण , कुणाल म्हात्रे  : एका फर्म मधील भागीदारा बरोबरच कट रचल्या प्रकरणी एका चार्टर्ड अकाउंटंट च्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. हा फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्या मुळे या सीएच्या डोक्यावर नोंदणी बरखास्तीची तसेच अटकेची टांगती तलवार लटकू लागली असल्याचे दिसून येत असल्याचे बोलले जात आहे.


      या बाबत आपल्या फायद्या साठी एका फर्मच्या भागीदारांसोबत फसवणूक करून गुन्हेगारी कट रचल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली असून या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.  या प्रकरणी पोलीस गुन्हा दाखल करण्यात करण्यात आल्याने तसेच चार्टर्ड अकाउंटंटच्या असलेल्या संस्थेकडे तक्रार करण्यात आल्याने या सीएची मान्यता रद्द होवू शकते असे या बाबत बोलले जात आहे. या प्रकरणी  सीए विनोद धनकाणी विरोधात अटकेची टांगती तलवार लटकू लागली आहे.


         मनोहर केसवानीराजकुमार यांची बेकायदेशीररीत्या बाजू घेत सीए विनोद धनकानी यांनी अशोक केसवानी आणि किशोर केसवानी यांची फसवणूक केल्याचे या प्रकरणात उघड झाले आहे.  सीए विनोद धनकानी यांनी कोणतीही कायदेशीर प्रक्रिया स्वीकारली असल्याचे या बाबत  दिसून येत नसून त्यांनी प्रकियेचे पालन केले नाही. सीए धनकानी यांनी जाणूनबुजून इतरांचा बेकायदेशीरपणे फायदा करून देण्यासाठीत्याचप्रमाणे इतर भागीदार अशोक केसवानी आणि किशोर केसवानी यांची फसवणूक केल्याचे उघड झाले आहे.


या प्रकरणात कंपनीचे अनेक दस्तऐवज बनावट केले गेले असल्याचे दिसून येत असून  ज्यामुळे बेकायदेशीरपणे मनोहर केसवानीराजकुमार केसवानी आणि इतरांना सरकारी रेकॉर्डमध्ये भागधारक बनवण्यासाठी फायदा झाला आहे,  आणि मनोहर केसवानीराजकुमार केसवानी आणि इतरांनी फसवणूक केली आहे हे उघड झाले आहे असे दिसून येत आहे. सीए विनोद धनकानीच्या सक्रिय मदतीने आणि संगनमतानेसंलग्न कंपनीच्या आर्टिकल ऑफ असोसिएशनमध्येअसोसिएशनच्या कलमाच्या अटी व शर्तींचे उल्लंघन करून आणि अशोक केसवानी आणि किशोर केसवानी यांची फसवणूक करण्यात आली आहे असे दिसून येत आहे.


या बनावट  कागदपत्रांच्या आधारेतक्रारदार किशोर केसवानी यांनी एफआयआर क्र. ४३/२०२१ आयपीसी कलम प्रमाणे ४२०,४०६,४०९,४६५,४६८,१२०-बी३४,४७१,३८० लोणावळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.दुसरे तक्रारदार अशोक केसवानी यांचा मुलगा दीपक केसवानी यांनी  चार्टर्ड अकाउंटंटची संस्था The Institute of Chartered Accountants of India (ICAI) कडे तक्रार दाखल केली असून या मध्ये शिस्तभंगाची कारवाई आणि सीए  विनोद धनकानी यांचा परवाना रद्द करण्याची मागणी केले आहे.


या बाबत सदर तक्रारी हून  ICAI ने तक्रारीची दखल घेतली आहे. आणि 17 मार्च 2022 रोजी हजर राहण्यासाठी या बाबत सीए विनोद धनकानी यांना नोटीस बजावण्यात आली आहेज्यामुळे कलम 420 फसवणूक आणि कलम 120 बी फौजदारी कट सारख्या गंभीर प्रकरणात सीए विनोद धनकानी यांच्या डोक्यावर अटकेची टांगती तलवार लटकत आल्याचे दिसून येत आहे.


        एवढेच नाही तर या सीए विनोद धनकानी याने अनेक लोकांची फवणुक केल्याची अशीच तक्रार उल्हासनगर मध्यवर्ती पोलीस ठाण्यात दाखल केल्याची माहिती समोर आली आहे. धनकाणी यांच्या विरोधात गुन्हाचा तपास उल्हासनगर मध्यवर्ती पोलीस ठाण्याचे पीएसआय अरुण केदार करत आहेत.  या प्रकारांची माहिती घेण्यासाठी सीए विनोद धनकानी यांच्याशी संपर्क साधून त्यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला गेला मात्र त्यांनी याबाबत आपण नंतर प्रतिक्रिया देणार असल्याचे सांगितले.

Post a Comment

0 Comments