महावितरणच्या एकूण महसुलात कोकण प्रादेशिक विभागाचा ४० ते ४५ टक्के वाटा महावितरणचे संचालक (प्रकल्प) प्रसाद रेशमे


डोंबिवली ( शंकर जाधव ) महावितरणच्या एकूण महसुलात कोकण प्रादेशिक विभागाचा ४० ते ४५ टक्के वाटा आहे. त्यामुळे या विभागाच्या कामगिरीवर विशेष लक्ष राहणार आहे. महावितरणने स्थापनेपासून विविध आव्हानांचा यशस्वीपणे सामना करत पुढे वाटचाल केली आहे. 


             सध्याच्या कठीण आर्थिक परिस्थितीत चालू वीजबिलासह थकबाकी वसुलीचे आव्हान महावितरणसमोर आहे. वीज ग्राहकांना उत्तम सेवा देणे आणि या दिलेल्या सेवेचे मोल वेळेवर मिळवणे हाच महावितरणचा प्राधान्यक्रम आहे. त्यासाठी वरिष्ठ स्तरापासून ते फिल्डवर काम करणारे कर्मचारी सातत्याने काम करत आहेत, असे प्रतिपादन महावितरणचे संचालक (प्रकल्प) प्रसाद रेशमे यांनी केले.


          संचालकपदी निवड झाल्यानंतर प्रथमच प्रसाद रेशमे यांनी कल्याण परिमंडळाला भेट दिली.रेशमे यांच्या  सन्मान  कार्यक्रमात सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते. कोकण प्रादेशिक विभागाचा पदभारही रेशमे यांच्याकडे असून या कार्यक्रमापूर्वी त्यांनी कल्याण मंडल एक आणि दोन कार्यालयांतर्गत वसुलीचा आढावा घेऊन मार्गदर्शन केले. 


       सत्काराच्या कार्यक्रमाला मुख्य अभियंता धनंजय औंढेकर, अधीक्षक अभियंते विजय मोरे, संदीप पाटील, किशोर उके, दीपक पाटील, दिलिप भोळे यांची प्रमुख उपस्थिती होती. संचालक (प्रकल्प) रेशमे म्हणाले,  याप्रसंगी सहायक महाव्यवस्थापक धैर्यशील गायकवाड, वरिष्ठ व्यवस्थापक विश्वनाथ कट्टा, कार्यकारी अभियंते नरेंद्र धवड, दिगंबर राठोड, धनराज बिक्कड, प्रवीण चकोले यांच्यासह विविध कामगार संघटनांचे पदाधिकारी, अभियंते, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. 


         सूत्रसंचालनाची जबाबदारी  सहायक महाव्यवस्थापक गायकवाड यांनी सांभाळली. तर कार्यकारी अभियंता बिक्कड यांनी आभार प्रदर्शन केले.

Post a Comment

0 Comments