जागेच्या वादातून माजी नगरसेवकाची महिलेला धक्का बुक्की बाजार पेठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल तर असा काही प्रकार घडला नसल्याचे माजी नगरसेवकाचे म्हणणे


कल्याण, कुणाल म्हात्रे  : जागेच्या वादातून माजी नगरसेवकाने महिलेला धक्काबुक्की केल्याची घटना कल्याण पश्चिमेतील गोविंदवाडी परिसरात घडली असून याप्रकरणी या महिलेने बाजारपेठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करत संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. तर या प्रकरणाशी आपला काहीही संबंध नसून असा काही प्रकार घडला नसल्याचे या माजी नगरसेवकाचे म्हणणे आहे. 


          कल्याण पश्चिमेतील दूधनाका परिसरात नातेवाईकां कडे राहणाऱ्या ६५ वर्षीय अख्तरुनिसा खलीक अहमद यांचे वडील  युसूफ अन्सारी  यांच्या दोन बायका होत्या. त्यांची पहिली  पत्नी नायब जहान उर्फ बदरूनिसा युसूफ अन्सारी ही अख्तरुनिसा अहमद यांची आई असून फातिमा युसूफ अन्सारी ही त्यांची सावत्र आई आहे. यसुफ अन्सारी  यांनी गोविंदवाडी येथे प्रजापती यांच्या जागेवर ४० वर्षांपूर्वी इमला पद्धतीने २० रूमचे बांधकाम करून त्या भाडेतत्त्वावर दिल्या आहेत. 


         अख्तरुनिसा अहमद या त्यांच्या जागेवर भाडोत्रीशी बोलत असतांना माजी नगरसेवक इफतेकार खान, फातिमा अन्सारी, बबलू खान यांनी त्यांच्या इतर साथीदारांसह येत धक्काबुक्की करत जीवे ठार मारण्याची धमकी देत शिवीगाळ करत मानसिक व शारीरिक त्रास दिल्याचा आरोप अख्तरुनिसा अहमद यांनी केला आहे. याबाबत त्यांनी बाजारपेठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करत संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. 


        तर याबाबत माजी नगरसेवक इफ्तेकार खान यांना विचारले असता या प्रकरणाशी आपला संबंध नसून असा कोणताही प्रकार घडला नसल्याचे त्यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments