बजाज ग्रुप ऑफ कंपनीजचे महाराष्ट्रात कोविड - १९ मेगा लसीकरण १ दशलक्षाहून जास्त डोसेज लाभार्थींना प्रदान ~


मुंबई, २३ मार्च २०२२: बजाज ग्रुप ऑफ कंपनीजचे समर्थन लाभलेल्या कोविड-१९ मेगा लसीकरण उपक्रमामध्ये कोविड-१९ लसींच्या १ दशलक्षाहून जास्त डोसेजचे पुणे आणि औरंगाबाद जिल्ह्यांमध्ये लाभार्थींना उपचार देण्यात आले, समुहामध्ये बजाज ऑटो लिमिटेड, बजाज फिनसर्व लिमिटेड, बजाज फायनान्स लिमिटेड, बजाज आलियान्स जनरल इन्श्युरन्स कंपनी लिमिटेड आणि बजाज आलियान्स लाइफ इन्श्युरन्स कंपनी लिमिटेडचा आंतर्भाव होतो.


      पुणे महानगरपालिका, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पुणे जिल्हा परिषद आणि औरंगाबाद महानगरपालिकांच्या जिल्हा प्राधिकरणांना एकूण १० लाखांहून जास्त लसींचे डोस उपलब्ध करुन देण्यात आले होते. मेगा लसीकरण ड्राइव्हची सुरुवात ऑगस्ट २०२१मध्ये झाली होती, यामध्ये शहरभरात, ग्रामिण भागात आणि पुणे औरंगाबादच्या झोपडपट्टी भागांमध्ये नियुक्ती केलेल्या उपक्रमाला समर्थन देणा-या ऑन-ग्राउंड हेल्थकेअर वर्कर्सचे समर्थन लाभलेल्या ६००हून जास्त कोविड लसीकरण केंद्रांना (सीव्हीसी) वितरण करण्यात आले.


     बजाज ग्रुप ऑफ कंपन्यांनी स्थानिक प्राधिकरणांच्या सहयोगाने मोठ्याप्रमाणात जागरुकता आणि समावेशक कार्यक्रमाचे ग्रामिण आणि झोपडपट्टी क्षेत्रातल्या पात्र लोकसंख्येला त्यांचा लसीचा पहिला आणि दुसरा डोस घेण्यासाठी प्रोत्साहन दिले गेले.


    बजाज फिनसर्व्ह लिमिटेडचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक संजीव बजाज यांनी सांगितले की, "महामारी शतकातून एकदा होणारी घटना आहे, यामुळे संपूर्ण जग या अनपेक्षित आरोग्य स्थितीसाठी एकत्र आले. भारत सरकारने जगातला सर्वात मोठा लसीकरण कार्यक्रम चालवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली आणि सर्वप्रथम १०० दशलक्ष लसीकरण करण्याचा मान मिळवला जो अतिशय प्रेरणादायक आणि महत्वपूर्ण आहे. 


        बजाज ग्रुपने मेगा लसीकरण ड्राइव्हला समर्थन करणे हे शासनाच्या लसीकरणात (इम्युनायजेशन) दूरदर्शीपणा समजण्यातले मोठे पाऊल आहे. आम्ही पुणे आणि औरंगाबादच्या फ्रंटलाइन वर्कर आणि स्थानिक शासकीय संस्थांच्या निरंतर कष्टांना, वचनबध्दतेला आणि समर्पणाला सलाम करतो, ज्यांच्याशिवाय हा १ दशलक्षाहून अधिकचा टप्पा अशक्यप्राय असता.”

Post a Comment

0 Comments