डोंबिवली ( शंकर जाधव ) जागतिक महिलादिना निमित्त दिवा स्टेशनात मुमताज काझी या रेल्वे महिला चालकाचे भारतीय मराठा संघ, दिवा रेल्वे प्रवासी संघटनेच्या महिलांनी सत्कार केला.दिव्यात रेल्वे महिला चालकाचे स्वागत करण्याचे हे सहावे वर्ष असून त्यावेळी उपस्थित असणाऱ्या नागरिकांनी ही महिलांना शुभेच्छा दिल्या.
स्मिता जाधव यांनी काझी यांना शाल देऊन सत्कार केला. भारतीय मराठा संघाच्या उपाध्यक्षा श्रावणी गावडे यांनी पुष्पगुच्छ देऊन महिला दिनाच्या त्यांना शुभेच्छा दिल्या. त्यानंतर दिवा स्टेशनवरील पोलीस दलातील महिला, सफाई कर्मचारी, उद्घोषणा करणाऱ्या महिला, रेल्वे फाटकावरील महिला कर्मचारी यांचाही गुलाबाचे फुल देऊन सन्मानित करण्यात आले.
0 Comments