मनोज कटके हल्ला प्रकरण... भाजपचे मंगळवारी पोलीस ठाण्या समोर उपोषण..


डोंबिवली ( शंकर जाधव ) २८ फेब्रेवारी रोजी भाजप कार्यकर्त्याला जीवघेणा हल्ला झाल्याची घटना घडली होती. या घटनेला १२ दिवस उलटले तरी हल्लेखोरांचा तपास लागला नसल्याने भाजपने आमदार रविंद्र चव्हाण यांनी शनिवारी डोंबिवली रामनगर पोलीस ठाण्यात कल्याण परिमंडळ-३ चे पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ यांची भेट घेतली. हल्ला करण्यामागे राजकीय लोकांचा हात असल्याचा आरोप चव्हाण यांनी यावेळी केला. या प्रकरणाचा छडा का लागत नाही असा प्रश्न उपस्थित करत सांगत मंगळवारी पोलीस ठाण्यासमोर उपोषणाला बसण्याचा इशारा चव्हाण यांनी पत्रकारांशी बोलताना दिला.

   

        भाजप कार्यकर्ता मनोज कटके हा दुकानात बसला असताना दोन अज्ञात इसमांनी त्याच्या डोळ्यात मोरचीही पूड टाकली.तोंडावर रुमाल लागलेल्या हल्लेखोरांनी कटके यांना बेदम मारहाण करून पळ काढला. या थरार दुकानातील सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला असला तरी आरोपीचे चेहरे स्पष्ट दिसत नाहीत.कटके यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.या प्रकरणी डोंबिवली रामनगर पोलिसांनी हल्लेखोरांविरोधात ३२४ कलम ( मारहाण ) , ३२६ (जबरी मारहाण ) कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.या प्रकाराला १२ दिवस उलटले तरी पोलिसांना हल्लेखोरांपर्यत पोहचण्याचा धागा मिळाला नाही असे दिसते.


       शनिवारी आमदार रविंद्र चव्हाण, कल्याण जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे, मंदार हळबे, विकास म्हात्रे, नंदू जोशी, नंदू परब,पूनम पाटील यांसह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते रामनगर पोलीस ठाण्यात गेले. कल्याण परिमंडळ-३ चे पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ यांची भेट घेऊन आमदार चव्हाण यांनी निवदेन दिले.त्यानंतर आमदार चव्हाण यांनी पत्रकारांशी बोलताना कटके यांच्या ह्ल्लामागे काही राजकीय लोक असल्याचा आरोप केला.आमदार चव्हाण म्हणाले, या हल्ल्यात पोलिसांनी ३०७ ( जीवे मारण्याचा प्रयत्न ) हे कलम लावले नाही. कोणामुळे हा हल्ला झाला, कश्यामुळे हा हल्ला झाला असावा यांचीही माहिती पोलिसांना दिली.


       डोंबिवलीत शहरात काही वाईट प्रवृत्तीची माणसे आहेत.ती सातत्याने काही गुंड लोकांना घेऊन शहरातील वातावरण बिघडण्याचे काम करतात. पोलिसांना माहिती देऊनही त्या दिशेन तपास का होत नाही.विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी कटके हल्लाप्रकरणात हल्लेखोरांना लवकरात लवकर अटक करा असे पोलिसांना सांगितले आहे. मंगळवारी रामनगर पोलीस ठाण्यात उपोषणास बसू असा इशारा आमदार चव्हाण यांनी यावेळी दिला. याबाबत कल्याण परिमंडळ-३ चे पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ यांना विचारले असत त्यांनी याप्रकरणी पोलिसांचा तपास सुरु असल्याचे सांगितले.

 

चौकट

 काय आहे नेमके प्रकरण...


    भाजपा सोशल मिडीया  मनोज कटके हा २० फेब्रेवारी रोजी हा दुकानात बसला असताना दोन अज्ञात इसमांनी त्याच्या डोळ्यात मोरचीही पूड टाकली.तोंडावर रुमाल लागलेल्या हल्लेखोरांनी कटके यांना बेदम मारहाण करून पळ काढला.या थरार दुकानातील सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला असला तरी आरोपीचे चेहरे स्पष्ट दिसत नाहीत.कटके यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

Post a Comment

0 Comments