कल्याण पूर्वेत युवती सेनेच्या वतीने आरोग्य कर्मचाऱ्यांचा सन्मान महिलांनी स्वावलंबी बनावे - डॉ. काशीकर


कल्याण : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून कल्याण पूर्वेत युवती सेनेच्या वतीने महापालिकेच्या आरोग्य केंद्रात काम करणाऱ्या आरोग्य कार्माच्यांचा सन्मान करण्यात आला. युवती सेनेच्या जिल्हा समन्वयक तेजस्वी शरद पाटील यांच्या संकल्पनेतून हा उप्रकम राबविण्यात आला. महिलांनी कोणत्याही कारणासाठी इतरांवर अवलंबून न राहता स्वावलंबी बनावे असे आवाहन यावेळी डॉ. काशीकर यांनी केले.    


       कोरोना काळात सर्वात मोलाचं काम हे आरोग्य कर्मचाऱ्यांनी केलं असून महिला डॉक्टर, परिचारिका, आरोग्य कर्मचारी हे आपल्या जीवाची पर्वा न करता नागरिकांवर उपचार करण्यासाठी अहोरात्र झटत होत्या. त्यामुळे अशा या लढवय्या महिला आरोग्य कर्मचाऱ्यांचा सन्मान युवती सेनेचे वतीने करण्यात आला. यावेळी कल्याण पूर्वेतील कोळसेवाडी येथील महापालिकेच्या आरोग्य केंद्रातील डॉक्टर, परिचारिका यांचा पुष्पगुच्छ, शाल, गुलाबपुष्प, छोटी बॅग देऊन कार्याचा गौरव करण्यात आला.


       गेल्या दोन वर्षात न थकता न थांबता रूग्णालयासोबतच रस्त्यावर उतरून देखील महिला डॉक्टरांनी काम केले आहे. आज प्रत्येक क्षेत्रात जमिनीपासून ते आकाशापर्यंत महिलांचे नाव आहे. शेतकरी, डॉक्टर, इंजिनियर, पायलट, वकील, शिक्षक, नर्स अशा अनेक भूमिका महिला निभावत आहेत. अशा या महिलांना त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून शिवसेना, महिला आघाडी यांच्या मार्गदर्शनाखाली युवती सेनेच्या वतीने आरोग्य कर्मचाऱ्यांचा सन्मान केला असल्याचे युवती सेना जिल्हा समन्वयक तेजस्वी पाटील यांनी सांगितले.


       तर महिलांचा स्पेशल दिवस असा नसतो, रोजचा दिवस हा महिलांचा असतो. आपण घडवू तो दिवस आपला आहे. आधीच्या थोर महापुरुषांनी, व्यक्तींना आपल्याला घडवलं आहे. त्यांच्याकडून महिला खूप काही शिकल्या आहेत. रोजच्या जीवनात प्रत्येकाकडून काही ना काही शिकता येतं. महिलांनी स्वतःच्या पायावर स्वतः सक्षम व्हावं महिला कुठल्याही क्षेत्रात पुरुषांपेक्षा कमी नाही किंवा मागे नाही. महिला फक्त घर न सांभाळता बाहेर प्रत्येक क्षेत्रात महिला आहेत. त्यामुळे इतरही महिलांनी कोणत्याही कारणासाठी इतरांवर अवलंबून न राहता स्वावलंबी बनावे असे आवाहन यावेळी डॉ. काशीकर यांनी केले.   


       यावेळी युवती सेनेच्या जिल्हा समन्वयक तेजस्वी पाटील, शहर चिटणीस मयुरी पाटील, उपशहर युवती अधिकारी प्राजक्ता मुठे, विभाग अधिकारी ज्ञानेश्वरी तळेले, दर्शना मालुसरे, दीपिका केळजी, यशश्री तांबे आदींसह शिवसेना, महिला आघाडी, युवती सेनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. तर कोळसेवाडी आरोग्य केंद्राच्या डॉ. काशीकर, वैशाली शिर्के, ममता पाटील, विद्या तळेकर, वर्षा कोकणे, आरती कुंभारे, कीर्ती कुलकर्णी, कविता बनसोडे, आम्रपाली उघाडे आदी आरोग्य कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला.  

Post a Comment

0 Comments