आमदार विश्वनाथ भोईर यांच्याहस्ते प्रभाग क्र. ११ मध्ये विकासकामांचा शुभारंभ नगरसेवक मोहन उगले यांच्या प्रयत्नांना यश


कल्याण : नगरसेवक मोहन उगले यांच्या प्रयत्नांना यश आले असून आमदार विश्वनाथ भोईर यांच्याहस्ते कल्याण पश्चिमेतील प्रभाग क्र. ११ मध्ये विकासकामांचा शुभारंभ करण्यात आला.  


प्रभाग ११ बेतुरकरपाडा, ठाणकरपाडा, रमाबाई आंबेडकरनगर या प्रभागातील गणेश कृपा कॉलनी ते लक्ष्मी जीवदानी निवास पर्यंत उर्वरित कॉंक्रिटीकरण कामाचा भूमिपूजन सोहळा आणि नागेश्वर मंदिर येथील केलेल्या पायवाटाच्या कामाचा लोकार्पण सोहळा रविवारी पार पडला. प्रभागातील विकासकामे मार्गी लावण्यासाठी नगरसेवक मोहन उगले नेहमी प्रयत्नशील असून यासाठी आमदार विश्वनाथ भोईर यांच्याकडे पाठपुरावा करून प्रभागातील कामांसाठी निधी आणला आहे.


       प्रभाग क्र. ११ मध्ये दर आठवड्याला, १५ दिवसांनी नगरसेवक मोहन उगले हे विकासकामे करत असतात. जे लोकांना हवं आहे ती लोकांची गरज हेरून कामं करण्यात मोहन उगले यांचा हातखंडा आहे. योग्य ठिकाणी काम केल्याने त्याची पावती हि मिळत असते. त्यामुळे आगामी काळात या प्रभागात शिवसेनेचे पॅनल हमखास निवडून येईल असा विश्वास आमदार विश्वनाथ भोईर यांनी व्यक्त केला.


       यावेळी आमदार विश्वनाथ भोईर यांच्यासह माजी सभागृह नेते अरविंद मोरे, नगरसेवक मोहन उगले, विद्याधर भोईर, विजय काटकर, परिवहन समिती सदस्य सुनील खारूक, शाखा प्रमुख अनंता पगार, स्वप्नील मोरे, महिला शहर संघटक सुजाता धारगळकर,शाखा संघटक नेत्रा उगले, महिला उपविभाग संघटक संगीता राजगुरू आदींसह समस्त शिवसैनिक पदाधिकारी,युवासैनिकमहिला आघाडीतसेच ठाणकर पाडा परिसरातील रहिवासी उपस्थित रहावे.

Post a Comment

0 Comments