डोंबिवली ( शंकर जाधव ) उत्तरप्रदेश, गोवा, मणिपूर आणि उत्तराखंड या चार राज्यात भाजपला बहुमत मिळाल्याने डोंबिवलीजवळील दावडी गावात भाजपने जल्लोष केला.येथील राममंदिरार प्रभू श्रीरामचंद्रचे दर्शन करून नागरिकांना लाडू देण्यात आले.यावेळी मंदिरप्रमुख हरिशंकर पांडे,आमदार रविंद्र चव्हाण, उत्तरभारतीय ग्रामीण मंडळ अध्यक्ष बबलू तिवारी, डोंबिवली ग्रामीण मंडळ अध्यक्ष नंदू परब यांसह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी १४०० किलो लाडूचे वाटप झाले.
यावेळी आमदार चव्हाण म्हणाले, ज्याप्रमाणे चारही राज्यातील जनतेने भाजपावर विश्वास ठेवला आहे त्याचप्रमाणे २०२४ साली महाराष्ट्राची जनताहीहि भाजपाला भरभरून मतदान करेल.पालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीतही भाजपला जास्तीत जास्त मतदान करण्याची विनंती आमदार चव्हाण यांनी यावेळी केली. तसेच २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपला स्पष्ट बहुमत मिळेल याचा शंका नसल्याचेही आमदार यांनी यांनी सांगितले.
1 Comments
The Eight-Wheel Classic - TITIAN Arts
ReplyDeleteThe eight-wheel filmfileeurope.com classic titanium earrings bicycle is available in six sizes. The https://vannienailor4166blog.blogspot.com/ Bicycle ventureberg.com/ Wheel is a classic bicycle made in USA, but there are three variations in wooricasinos.info