कराटे चॅम्पियन्स क्लबच्या खेळाडूंचे सुयश


डोंबिवली ( शंकर जाधव )  कराटे चॅम्पियन्स क्लब ऑफ दिवा या क्लबच्या खेळाडूंनी ई- काता राज्यस्तरीय स्पर्धेत घवघवित यश संपादन केले. या स्पर्धेत दिवा क्लबने 2 सुवर्ण, 3 रौप्य आणि ३ कांस्य पदकांची कमाई केली. या स्पर्धेत ५००  हून अधिक खेळाडूंनी सहभाग घेतला होता.


         या स्पर्धेतील श्रिजीत खतुवा (सुवर्ण मेडल), धिरेन सिंघ (सुवर्ण मेडल), लवेशा खसासे (रौप्य मेडल), अनिष्का खसासे (रौप्य मेडल), संचीता खतूवा (रौप्य मेडल), शार्दूल मर्ढेकर (कांस्य मेडल), ऋत्विक तावडे (कांस्य मेडल) आणि शिवानी बागुल (कांस्य मेडल) या यशस्वी स्पर्धकांचा प्रमाणपत्र प्रदान करून नगरसेविका दर्शना म्हात्रे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. 


            या प्रसंगी प्रियांका निंबाळकर यांचेही विशेष कौतुक करण्यात आले. या प्रसंगी बोलताना नगरसेविका दर्शना म्हात्रे म्हणाल्या, प्रत्येक विद्यार्थ्यांच्या अंगी काहीना काही सुप्त कला, गुण आणि कौशल्य लपलेले असते. त्यामुळेच असे विद्यार्थी पुढे जाऊन उत्कृष्ट खेळाडू बनतात. अशा खेळाडूंना योग्य प्रशिक्षण व प्रोत्साहन देण्याची गरज असते असेही त्या म्हणाल्या. 


           सीकेसी कराटे चॅम्पियन्स क्लबच्या माध्यमातून प्रियांका निंबाळकर या उत्कृष्ट काम करत आहेत. त्या स्वसंरक्षणाचे धडे देत आतात अशी स्तुती करून नगरसेविका दर्शना म्हात्रे यांनी उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना आगामी स्पर्धेसाठी. शुभच्या दिल्या. कार्यक्रमाला चरणदास म्हात्रे, प्रा. संदेश मोरे, आदी मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments