कल्याण ग्रामीण भागातील वनविभागाच्या जागेवरील अतिक्रमणावर कारवाईचा बडगा

■फार्म हाऊस सह निर्माणाधिन चाळींची कामे केली भुईसपाट


कल्याण : कल्याणच्या ग्रामीण भागातील वनविभागाच्या जागेवरील अतिक्रमणावर कारवाईचा बडगा उगारण्यात  आला असून फार्म हाऊससह निर्माणाधिन चाळींची कामे यावेळी भुईसपाट करण्यात आली.


 कल्याणच्या ग्रामीण भागात वनविभागाची मोठ्या प्रमाणावर जमीन असून या जमिनीवर आतापर्यत मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण झाले आहेत. वन विभागाच्या मालकीच्या हेदुटणेभालधामटन या परिसरात मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण करत चाळीच नव्हे तर फार्म हाउस देखील थाटण्यात आले आहेत. 


या अतिक्रमण करणाऱ्याना वन विभागाकडून नोटीसा धाडत संबधित जागा मालकीचे पुरावे सादर करण्याचे निर्देश देण्यात आले होते मात्र संबधिताकडून कोणतेही पुरावे प्राप्त न झाल्याने आज वनविभागाच्या अधिकार्यांनी या अतिक्रमणावर कारवाई करत फार्म हाउस आणि बैठ्या चाळीचे बांधकाम तोडले आहे.


या कारवाईदरम्यान वनविभागाच्या पथकाला विरोध करण्यात आला मात्र विरोध डावलून  एस आर पी च्या मदतीने ही कारवाई करण्यात आली .दरम्यान स्वताची आणि प्रशासनाची फसवणूक टाळण्यासाठी नागरिकांनी वनविभागाच्या जमिनीवर केलेल्या बांधकामाबाबत खरेदी विक्रीचे व्यवहार करू नये असे आवाहन वनविभागाकडून रघुनाथ चन्ने यांनी केले आहे. 

Post a Comment

0 Comments