महाराष्ट्र राज्य कला शिक्षक महासंघ डोंबिवली शहर अध्यक्षापदी संगीता पाटील


डोंबिवली ( शंकर जाधव ) महाराष्ट्र राज्य कला शिक्षक महासंघाच्या डोंबिवली शहराध्यक्षापदी अभिनव विद्यालयतील   संगीता  पाटील यांची नियुक्ती करण्यात आली. कलाविषयक आणि कला शिक्षकांच्या हितार्थ प्रश्न, समस्या सोडवून संविधानिक, लोकशाही मार्गाने पाठपुरावा करणारे कलाशिक्षक महासंघ कार्यरत आहे. 


          श संगीता  पाटील यांनी विद्यार्थी केंद्रबिंदू मानून कलाविषयक आणि कलाशिक्षक समस्या, प्रश्न संविधानिक आणि लोकशाही मार्गाने अग्रक्रमाने मांडून त्या सोडविण्यासाठी काम केले आहे. तसेच शाळेत अनेक विद्यार्थी हिताचे उपक्रम राबवून कलाविषय जिवंत ठेवला. राज्य कला शिक्षक महासंघाने पाटील यांच्या कामाची दखल घेऊन नियुक्ती केली. महाराष्ट्र राज्य कला शिक्षक महासंघ वाढीसाठी प्रयत्न करणार असल्याचे यावेळी  संगीता पाटील यांनी सांगितले.


          महाराष्ट्र राज्य कला शिक्षक महासंघाचे प्रदेश अध्यक्ष विनोद इंगोले,प्रदेश सरचिटणीस प्रल्हाद साळुंके, प्रदेश उपाध्यक्ष प्रल्हाद शिंदे, रामचंद्र इकारे, प्रदेश सहचिटणीस सुहास पाटील, कोषाध्यक्ष रमेश महाजन, मुंबई विभागीय अध्यक्ष मोहन माने, मुंबई विभाग महिला अध्यक्षा भारती जाधव ,वाशिम जिल्हा सचिव गोपाल गावंडे, महाराष्ट्र राज्य महिला आघाडी प्रमुख नीता राऊत, ठाणे जिल्हा अध्यक्ष अनिल ठाकरे, जिल्हा सचिव संजय काशीद यांचे सहकार्य लाभले.

Post a Comment

0 Comments