रिक्षा चालकां कडून वाहतूक पोलिसांना घेराव

  


डोंबिवली ( शंकर जाधव ) वाहतूक पोलीस आणि रिक्षा चालक यांच्यातील समनव्य नसून वाद आहेत हे सर्वांना ठाऊक आहे.डोंबिवलीत वाहतूक पोलिसांच्या कामकाजावर नाराज असलेल्या रिक्षाचालकांनी चक्क वाहतूक पोलिसांनी घेराव घातला.ही घटना मंगळवारी/सकाळच्या सुमारास  डोंबिवली पूर्वेकडील इंदिरा चौकात घडली.एका रिक्षाचालकाला दोन तासात एकाच वाहतूक वाहतूक पोलिसाने दोनदा फाईन मारल्याने हा वाद वाढला.
  

दिनेश मेहता या  रिक्षाचालकाला दोन तासात  वाहतूक पोलिसांनी ई चलान मार्फत दोनदा फाईन मारल्याने रिक्षाचालक संतापले होते. या ठिकाणी रिक्षाचालक जमा झाल्याने वातावरण चांगलेच तापले होते. रिक्षाचालकांनी याबाबत वाहतूक पोलिसांना फेराव घातला.त्यानंतर रिक्षाचालकांनी आपला मोर्चा वाहतूक नियंत्रण उपशाखेच्या कार्यालयात वळवला.

 
ई चलान बाबत अनेक तक्रारी यावेळी मांडण्यात आल्या. तसेच  फ्रंट सीटचा नियम केवळ सकाळी लागू केला जातो. संध्याकाळी गर्दी असल्याने डोळेझाक केली जाते. मग सकाळी वेगळा नियम गर्दी असल्यावर वेगळा नियम का? असा जाबही यावेळी  विचारण्यात आला.अशा पद्धतीने फाईन लावला गेला तर आम्ही कमवायचा किती ? घर कसं चालवायचा आणि  फाईन तरी किती भरायचा ? असे प्रश्न रिक्षाचालकांनी उपस्थित केले.


यावेळी भाजप प्रणित रिक्षाचालक मालक संघटनेचे दत्ता माळेकर म्हणाले, एका वाहतूक पोलिसाने  दोन तासात एका रिक्षाचालकाला दोनदा फाईन मारला तर रिक्षाचालकाने . कमवायचे किती? आणि दंड भरायचा तरी किती? हे सर्व थांबलं नाही तर वाहतूक शाखेवर  मोर्चा काढू. केवळ मार्च एडिंगचं टार्गेट पूर्ण करण्यासाठी हा सर्व खटाटोप सुरू आहे. 


तर वाहतूक नियंत्रण उपशाखेचे पोलीस निरीक्षक उमेश गित्ते यांना विचारले असता ते म्हणाले, ई चलान बाबत लवकरच जनजागृती करण्यासाठी एक मेळावा आयोजित करण्यात येईल. डिजिटल प्रक्रिया असल्याने फाईन सोबत फोटोही जोडला जातो. तरी याबाबत अधिक चौकशी करून पुढील कार्यवाही केली जाईल. 

Post a Comment

0 Comments